बांगलादेशी, रोहिंग्या यांच्या बंदोबस्तासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस सिद्ध !
पुणे – पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात गेल्या वर्षभरात ३३ घुसखोर बांगलादेशींना पोलिसांनी अटक केली आहे. ‘यापुढील काळात ही कारवाई आणखी तीव्र करण्यात येईल. शहर आणि देश यांच्या सुरक्षेत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही’, अशी आक्रमक भूमिका भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी घेतली आहे. लांडगे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारचे लक्ष वेधले होते. ‘ही गोष्ट राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची असल्यामुळे सरकार चौकशी करून कारवाई करील’, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून कुदळवाडी-चिखली परिसरात अतिक्रमण कारवाई करण्यात आली. त्यामध्ये अवैध भंगाराची दुकाने आणि बांगलादेशी घुसखोरांची आश्रयस्थळे पाडण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरामधील म्हाळुंगे, निगडी, पिंपरी, भोसरी, भोसरी एम्.आय.डी.सी., सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एम्.आय.डी.सी. आणि देहूरोड या परिसरात बांगलादेश अन् रोहिंग्या यांना अटक केली आहे. सर्वाधिक बांगलादेशींना भोसरी परिसरातून अटक करण्यात आली आहे. भोसरीमध्ये वर्षभरात १२ बांगलादेशींना अटक केली असून ते बनावट कागदपत्रांद्वारे रहात होते. आधारकार्ड, पॅन कार्ड यांसह इतर कागदपत्रेही या बांगलादेशींकडून जप्त करण्यात आली आहेत.
मालेगावमधील घुसखोरांच्या जन्म दाखल्याच्या घोटाळ्याच्या चौकशीसाठी ‘एस्.आय.टी.’ स्थापन !
मुंबई – मालेगाव येथे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना देण्यात येणार्या जन्माच्या दाखल्याच्या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी ८ जानेवारी या दिवशी ‘एस्.आय.टी.’ (विशेष अन्वेषण पथक) स्थापन करण्यात आली आहे. यासाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.
मालेगाव हे बांगलादेशी आणि रोहिंग्या यांचे आश्रयस्थान बनले असून वर्षभरात येथे सुमारे १ सहस्र घुसखोर बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना भारतीय असल्याचा दाखला देण्यात आल्याचा प्रकार किरीट सोमय्या यांनी उघडकीस आणला होता.
संपादकीय भूमिका :घुसखोरी केलेल्या सर्वच रोहिंग्या आणि बांगलादेशी धर्मांधांना भारताबाहेर हाकलणे आवश्यक ! |