कपडे पालटणार्‍या विद्यार्थिनींचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न !

पुणे येथील नामांकित शाळेतील प्रकार !

प्रतिकात्मक चित्र
  • शिपाई तुषार सरोदे याला अटक
  • विद्यार्थिनींच्या जागरूकतेमुळे प्रकार उघडकीस !

पुणे – पाषाण भागातील एका नामांकित शाळेत विद्यार्थिनींच्या कपडे पालटण्याच्या खोलीत भ्रमणभाष ठेवून शिपाई तुषार सरोदे याने चित्रीकरण केले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. (शाळेतील कर्मचार्‍यांची चारित्र्य पडताळणी करणे आवश्यक आहे. अशा गुन्हेगारांना कायमची अद्दल घडेल, अशी शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक) या प्रकरणी चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

विद्यार्थिनींनी शिपायाला तेथून जाण्यास सांगितले. तेव्हा त्याने त्याच्या भ्रमणभाषचा कॅमेरा चालू करून विजेच्या बोर्डवर ठेवला. हे लक्षात आल्यावर विद्यार्थिनींनी तात्काळ ते चित्रीकरण काढून टाकले. हे समजताच संबंधित पालकांनी शाळा व्यवस्थापनाची भेट घेतली. व्यवस्थापनाने तात्काळ पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली.