हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांच्याकडे मागणी केल्याचा परिणाम
हिंदूंनो, या यशाविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करा !

पणजी, १३ नोव्हेंबर – सातत्याने हिंदूंच्या देवतांचा अवमान करणारा गुजरात येथील स्वयंघोषित विनोदी कलाकार मुनव्वर फारूकी यांचा ‘डोंगरी टू नोवेअर’ (Dongri to Nowhere) हे शीर्षक असलेला कार्यक्रम १५ नोव्हेंबर या दिवशी गोव्यात होणार होता. हा कार्यक्रम गोव्यातील सामाजिक आणि धार्मिक सलोखा टिकवून ठेवण्यासाठी रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने उत्तर गोव्याच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी मामु हागे आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. त्यानंतर काकुलो मॉलच्या व्यवस्थापकांनी कार्यक्रम रहित केल्याचे हिंदु जनजागृती समितीला कळवले आहे. १५ नोव्हेंबरला सायंकाळी ७.३० वाजता ‘एल्.व्ही.सी. कॉमेडी क्लब’ येथे हा कार्यक्रम होणार होता. या कार्यक्रमाची तिकिटे ‘बूक माय शो’वर विक्रीस उपलब्ध होती.
Comedian Munawar Faruqui’s Goa gig nixed https://t.co/tSBSey8cUc
— TOI Goa (@TOIGoaNews) November 13, 2021
निवेदन देतांना हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळामध्ये हिंदु जनजागृती समितीचे श्री. सत्यविजय नाईक, गोमंतक मंदिर महासंघाचे श्री. जयेश थळी, श्री. संजय नायक, श्री. भारत हेगडे, श्री. केशव चोडणकर आणि श्री. सुशांत दळवी यांची उपस्थिती होती. या निवेदनाची प्रत पोलीस उपअधीक्षक श्री. संतोष देसाई आणि पणजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली.
या निवेदनात म्हटले होते की, जानेवारी २०२१ मध्ये इंदूर (मध्यप्रदेश) येथील ‘मुनरो कॅफेम्’मधील एका कार्यक्रमात मुन्नवर फारूकी यांनी हिंदु देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अत्यंत आक्षेपार्ह टिपण्या केल्या होत्या. या वेळी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. ३७ दिवस ते कारागृहात होते. त्यांनी यापूर्वीही अनेकदा हिंदु देवतांवर आक्षेपार्ह टीका केली आहे. या व्यतिरिक्त ‘सी.ए.ए.’ कायदा, ‘गोध्रा हत्याकांडातील कारसेवकांचा मृत्यू’ आदींविषयीही त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्ये केलेली आहेत. त्यांच्या अनेक आक्षेपार्ह वक्तव्यांची माहिती आणि व्हिडिओ आजही ‘यू-ट्यूब’वर उपलब्ध आहे. गोव्यातील शांतता अबाधित राखण्यासाठी हा कार्यक्रम तात्काळ रहित करावा.
हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कलाकार मुनव्वर फारूकी आम्हाला गोव्यात नकोत ! – जयेश थळी, गोमंतक मंदिर महासंघ
गोव्यात सध्या विधानसभा निवडणुकीचा काळ चालू आहे आणि याच काळात हिंदुद्वेष पसरवणार्या कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. यातून समाजात जाणूनबुजून २ धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे का ? असा प्रश्न निर्माण होतो. यापूर्वी चित्रकार म्हणवणारे हिंदुद्वेष्टे चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची नग्न चित्रे काढून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या. वास्तविक कलाकारांनी त्यांच्या कलेचा वापर धर्माविषयी जागृती करायला केला पाहिजे, याउलट कलेच्या माध्यमातून विटंबना केली जात आहे. याचा दुष्परिणाम अप्रत्यक्षरित्या पुढील पिढीवर होणार आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना आणि श्रद्धा नष्ट करण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे कलाकार मुनव्वर फारूकी आम्हाला गोव्यात नकोत. श्रीराम सेनेचे प्रमुख तथा प्रखर हिंदुत्वनिष्ठ प्रमोद मुतालिक यांच्यावर गोवा शासन प्रवेशबंदी घालते, तर वादग्रस्त विधाने करणारे मुनव्वर फारूकी यांच्या गोव्यातील कार्यक्रमाला गोव्यात का अनुमती दिली जाते ? शासन, पोलीस यंत्रणा आणि काकुलो मॉलचे व्यवस्थापन यांनी हा कार्यक्रम त्वरित रहित करावा. यासाठी लोकांना रस्त्यावर येण्यास भाग पाडू नये.
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !
Sewri Mumbai Muslims Attack : क्षुल्लक कारणावरून मुसलमानांकडून हिंदूंना भीषण मारहाण
Mohammed Zubair AltNews : (म्हणे) ‘कॉकरोच जनता पक्षा’च्या आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस घायाळ झाले नाहीत !
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !