देवतांची चित्रे असलेले फटाके जप्त करून श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांकडून पलूस पोलीस ठाण्यात जमा !

  • देवतांचा अवमान रोखणार्‍या श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे अभिनंदन ! – संपादक 
  • दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाणे आणि प्रशासन यांना या संदर्भात निवेदन दिल्यानंतरही प्रशासनाकडून कारवाई का केली जात नाही ? हिंदूंच्या धर्मभावनांना प्रशासनाच्या लेखी काहीच मोल नाही का ? हीच घटना अन्य धर्मियांविषयी घडली असती, तर प्रशासनाने अशीच उदासीनता दाखवली असती का ? हिंदूबहुल देशात हिंदूंच्याच धार्मिक भावना आणखी किती काळ अशाच प्रकारे तुडवल्या जाणार ? – संपादक 
पलूस पोलीस ठाणे

पलूस (जिल्हा सांगली), ४ नोव्हेंबर (वार्ता.) – देवतांची चित्र असलेले, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले फटाके विक्री होऊ नयेत यांसाठी २ दिवसांपूर्वी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने पलूस पोलीस ठाणे, नगरपरिषद आणि तहसीलदार कार्यालयात निवेदन देण्यात आले होते. असे असूनही काही दुकानांमध्ये देवतांची चित्रे असलेले फटाके विक्रीसाठी असल्याचे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांना आढळून आले. यामुळे संतप्त धारकर्‍यांनी असे फटाके जप्त करून पलूस पोलीस ठाण्यात जमा केले. ‘यापुढे असे प्रकार खपवून घेणार नाही’, असे धारकर्‍यांनी या प्रसंगी सांगितले. या कारवाईत धारकरी श्री. रोहित पाटील, श्री. सागर सुतार यांसह अन्य धारकरी उपस्थित होते.