१. दिवाळीत प्रेमाचे आदानप्रदान म्हणून नातेवाईक किंवा मित्रमंडळी यांना मिठाईची खोकी भेट दिली जातात किंवा आपल्याकडे मिठाईची खोकी येतात. काही वेळा त्या खोक्यांच्या वेष्टनांवर देवतांची चित्रे वा नावे असतात. ही खोकी रिकामी झाल्यावर कचर्यात टाकली जातात. ती खोकी कचर्यात न टाकता त्याचे अग्नीविसर्जन करूया आणि संबंधित दुकानदाराला वेष्टन पालटण्यासाठी संपर्क करून प्रबोधन करूया !
२. दिवाळीच्या काळात देवतांची चित्रे वा नावे असलेल्या लॉटरीच्या तिकिटांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. बरेच जण लॉटरीच्या तिकिटांचा उपयोग झाल्यानंतर ती चुरगळून फेकून देतात. दीपावलीत काही लॉटरीच्या तिकिटांवर देवतेचे चित्र छापतात. अशी तिकिटे दिसली, तर तीही कचर्यात न टाकता त्यांचे अग्नीविसर्जन करूया !
अध्यात्मशास्त्रानुसार देवतेचे नाव वा रूप असणे, म्हणजेच तेथे देवतेचे तत्त्व, म्हणजेच देवतेचे सूक्ष्मातून अस्तित्व असणे होय. म्हणून वरील प्रकारे देवतांची विटंबना झाल्याने देवतांची अवकृपा होते, तसेच राष्ट्रपुरुषांचाही अवमान होतो. म्हणून मिठाईची वेष्टने किंवा लॉटरीची तिकिटे यांच्यावरील देवता किंवा राष्ट्रपुरुष यांच्या चित्रांची विटंबना रोखा !
- अशा प्रकारचे अधर्माचरण स्वतः टाळा !
- याविषयी इतरांचेही प्रबोधन करा !
- हेतूपुरस्सर विटंबना करणार्यांचा निषेध करा आणि त्यांच्या उत्पादनांवर बहिष्कार टाका !
- धार्मिक भावना दुखावल्याच्या कारणावरून पोलीस ठाण्यात तक्रार करा !
(संदर्भ – सनातनचा ग्रंथ ‘सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र’ (भाग १))