प्रयागराज – यावर्षी महाकुंभच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश शासनाद्वारे ‘हरित महाकुंभ’ संकल्पना राबवण्यात आली आहे. या संकल्पनेवर आधारित कुंभक्षेत्रासह संपूर्ण प्रयागराजमध्ये तब्बल ३ लाख रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. महाकुंभानंतर या रोपट्यांचे उत्तरप्रदेश शासनाकडून संवर्धन केले जाणार आहे. महाकुंभकडे येणार्या १८ मार्गांवर या रोपट्यांची लागवड करण्यात आली आहे. या मार्गांवर ५० सहस्र रोपे लावण्यात आली आहेत, तर उर्वरित रोपे प्रयागराजमध्ये विविध भागांमध्ये लावण्यात आली आहे. कदंब, कडुलिंबू आणि अमलताश या वृक्षांच्या रोपट्यांचा यामध्ये समावेश आहे.