राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ४५ प्रांतांचे पदाधिकारी भाजपच्या प्रचाराची दिशा आखणार !
लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी देशाच्या ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.
लोकसभा आणि ५ राज्यांतील विधानसभा प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी देशाच्या ४५ प्रांतांतील वरिष्ठ पदाधिकारी गुजरात राज्यातील भूज शहरात ३ दिवसांसाठी एकत्र येत आहेत.
२४-२६ नोव्हेंबर या कालावधीत आयोजन !
हिंदु महामेळ्याला उपस्थित रहाण्याचे हिंदुत्वनिष्ठांना आवाहन !
संघाच्या नागपूर झालेल्या विजयादशमी सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध गायक शंकर महादेवन् उपस्थित होते.
पैशाच्या संपत्तीपेक्षा बुद्धीची संपत्ती महत्त्वाची आहे, हा भारतीय संस्कृतीतील विचार विसरता कामा नये. स्वत:च्या उपभोगासाठी, भविष्याची तरतूद, धार्मिक कार्यासाठी, समाजासाठी, राज्यकर्त्यांसाठी आणि आवश्यकतेच्या प्रसंगी संपत्तीचे समान भाग करावे, असे आवाहन सरसंघचालक प.पू. मोहन भागवत यांनी केले.
हा देश सत्याचा असून धर्मावर चालणारा आहे. त्यामुळे डाव्या विचारधारेची उत्तरक्रिया भारतच करील, असे स्पष्ट मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे व्यक्त केले.
आरक्षण हे काही आर्थिक आणि राजकीय बरोबरीपुरते मर्यादित नाही, तर ते सामाजिक बरोबरी आणि मान मिळणे, यांसाठी आहे. त्यामुळे राज्यघटनासंमत आरक्षणाचे संघाने नेहमीच समर्थन केले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हिंदु राष्ट्राची निर्मिती नक्कीच करील, अशी हिंदु समाजाची भावना आहे. हिंदुस्थान हे हिंदु राष्ट्र आहे, हे सत्य आहे. संघ हे नक्की करील, अशी प्रत्येकाची अपेक्षा आहे.
भारत जगाला ज्ञान, शुद्धता, समृद्धी आणि समर्पण शिकवण्यास सक्षम आहे. आपण सूर्याची पूजा करत असल्याने आपल्या देशाला ‘भारत’ या नावाने संबोधले जाते.
येणारा काळ हा भारत आणि सनातन धर्म यांचा आहे. वेद म्हणजे ज्ञानाचे भंडार आहे. वेदांमध्ये सर्व काही आहे. सातत्याने होणार्या आक्रमणांमुळे सर्वत्र, विशेषतः उत्तर भारतात वेदिक ज्ञानाची मोठी हानी झाली. अग्निहोत्राच्या अनुयायांनी युगानुयुगे या ज्ञानाचे रक्षण केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेला येथील कर्करोग रुग्णालयाचा पायाभरणी सोहळा प.पू. सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते भूमीपूजन करून पार पडला.