
मुंबई : राजा हा समाजामुळे असतो आणि नीट राज्यकारभार केला नाही, तर त्याला पायउतारही व्हावे लागते, अशी अनेक उदाहरणे आहेत. देशाचे उत्थान आणि पतन हे समाजाचे उत्थान अन् पतन यांवर अवलंबून असते. समाजपरिवर्तनात सामाजिक संस्थांसह सर्वांचेच दायित्व महत्त्वाचे असते, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. मुंबईतील विलेपार्ले येथील लोकमान्य सेवा संघाच्या १०१ व्या वर्धापनदिनानिमित्ताने ते ‘नागरिकांनी आणि राज्यकारभार करणार्या राज्यकर्त्यांनी कोणती मूल्य जपली पाहिजेत ?’, याविषयावर बोलत होते.
ते पुढे म्हणाले,
‘‘पैशांची उधळपट्टी न करता समाजात साधेपणाने आणि काटकसरीने रहावे. स्वदेशीची कास धरून गरजूंना आर्थिक साहाय्य करावे. घरात दोन मोटारगाड्या, महागडा स्मार्ट रंगीत दूरचित्रवाणी संच आदी चैनीच्या वस्तूंची खरोखर आवश्यकता आहे का ?, याचाही प्रत्येक सुजाण नागरिकाने विचार करावा. नागरिकांनी नियमांचे पालन करून पर्यावरणाचे रक्षण करावे. सुजाण, शिस्तप्रिय आणि देशभक्त नागरिक अन् समाज असेल, तर तो देश मोठा होतो. या दृष्टीने सामाजिक संस्थांनी नागरिकांमध्ये ही जाणीव आणि प्रेरणा निर्माण करण्यासाठी मनपरिवर्तनाचे दायित्व पार पाडावे.’’
FIR Against Kunal Kamra : विनोदी कलाकार कुणाल कामरा याच्याविरुद्ध हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी तक्रार !
Badrinath Temple Arrest : बद्रीनाथ मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी मंदिराच्या माजी अधिकार्याला अटक
Kerala High Court Orders Waqf Board : केरळ उच्च न्यायालयाकडून राज्य वक्फ बोर्डाला नीतीविषयक निर्णय घेण्यास बंदी
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड