
अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरातील मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे प्रमुख यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नसून श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र आहेत, अशी माहिती समोर आली आहे. १६ जानेवारपासून चालू झालेल्या प्राणप्रतिष्ठेच्या संदर्भातील विधींसाठी डॉ. मिश्र हे यजमानपद भूषवणार आहेत, तर २२ जानेवारीला प्रत्यक्ष मूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी पंतप्रधान मोदी विशेष यजमान असणार आहेत, असे सांगितले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल, ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, तसेच डॉ. अनिल मिश्र हे त्यांच्या पत्नीसह मुख्य सोहळ्याच्या वेळी गर्भगृहामध्ये उपस्थित असतील. त्या दिवशी पंतप्रधान मोदी श्री रामललाला नैवैद्य अर्पण करतील, तसेच आरतीही करतील.
Dr. Anil Mishra, Trustee of @ShriRamTeerth commenced the consecration ceremony as the 'Yajaman' (main host to perform rituals).
अनिल मिश्र । राम मंदिर प्राण प्रतिष्ठा
अयोध्या । श्री रामजन्मभूमि#RamMandirPranPratishtha pic.twitter.com/NYpiOIoWZZ— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 17, 2024
डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत. १६ जानेवारीला अयोध्येतील विवेक सृष्टी आश्रमामध्ये अनुष्ठानास प्रारंभ झाला आहे. काशीच्या पंडितांनी शरयू नदीमध्ये स्नान केल्यानंतर शुभारंभ केला आहे. या कार्यक्रमाचे मुख्य यजमान डॉ. अनिल मिश्र आणि मूर्ती घडवणारे अरुण योगीराज तेथे उपस्थित होते. हे अनुष्ठान २१ जानेवारीपर्यंत चालणार आहे.
Amir Khan : (म्हणे) ‘मी सोनम वांगचूक यांना ‘थ्री इडियट्स’ चित्रपटापूर्वी भेटलोच नव्हतो !’
Nagpur Police : वाहतूक पोलिसांना बंदूक बाळगणे बंधनकारक !
Vistara_Airlines : विस्तारा एअरलाईन्सला ग्राहक आयोगाकडून १ लाख रुपयांचा दंड
JeM Terrorist Arrested : गुजरातमध्ये जैश-ए-महंमदशी संबंधित ५ आतंकवाद्यांना अटक
AL Falah University : हरियाणातील अल्-फलाह वैद्यकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी अदीदशाह याला गांजासह अटक !
Karnataka Fake Currency Racket : टोळीकडून बनावट भारतीय चलनी नोटांची छपाई केली जात असल्याचे उघड !