Ram Mandir Ayodhya : पुढील १ सहस्र वर्षांचा पाया या प्राणप्रतिष्ठेच्या पवित्र क्षणानंतर आपल्याला रचायचा आहे !

माझी अपार श्रद्धा आहे की, आज जे काही घडले आहे, त्याची अनुभूती देश आणि विश्वातील कोपऱ्याकाेपऱ्यांत रामभक्तांना आली असणार ! २२ जानेवारी २०२४ हा दिनदर्शिकेतील दिनांक नाही, तर एका नव्या कालचक्राचा प्रारंभ आहे !

Ayodhya Rammandir Consecration : श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र आहेत प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान !

डॉ. अनिल मिश्र यांनी १६ जानेवारीच्या प्रायश्‍चित्त पूजनामध्ये सहभाग घेतला. आता पुढचे ७ दिवस ते यजमान असणार आहेत.

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी घेतले श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन !

राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी १८ डिसेंबर या दिवशी साडेतीन शक्‍तीपीठांपैकी एक असलेल्‍या श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन घेतले.

सनातन धर्माची जगाला आवश्‍यकता ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

सध्‍याची जागतिक परिस्‍थिती पहाता ज्‍याची मुळे भारतात आहेत, त्‍या सनातन धर्माची जगाला आवश्‍यकता आहे, असे मत राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्‍यक्‍त केले.

अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे, त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा ! – प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

‘धर्मस्य मूलं अर्थम् ।’ म्हणजेच आपल्या अर्थकारणाच्या मुळाशी धर्म असला पाहिजे. त्याचा विनियोग धर्मासाठी व्हायला हवा, असे प्रतिपादन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कल्याण येथे केले.

लोकमान्य टिळकांसारखे आदर्श राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक ! – सरसंघचालक प.पू. डॉ. मोहन भागवत

लोकमान्य टिळक यांच्या गुणसंपदेमुळे लाखो लोकांना प्रेरणा मिळते. असे आदर्श कोणत्याही राष्ट्राला सदासर्वकाळ आवश्यक असतात.

लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या शताब्दी कार्यक्रमास प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांची उपस्थिती !

शताब्दी वर्षाच्या शुभारंभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक प.पू. डॉ. मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत १७ डिसेंबरला लोकमान्य टिळक स्मारक मंदिराच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

राष्ट्रसेवा ही योगी बनून केली पाहिजे, भोगी होऊन नव्हे ! – प.पू. प्रेमानंद महाराज

आपला राष्ट्रध्वज आणि आपले राष्ट्र हे आपल्यासाठी देव आहे. तुम्ही तपाच्या माध्यमातून भजनाद्वारे (नामजपाद्वारे) लाखो लोकांची बुद्धी शुद्ध करू शकता. एक भजन लाखो लोकांचा उद्धार करू शकते. तुम्ही भजन करा, इंद्रियांवर विजय प्राप्त करा आणि राष्ट्रसेवा करा. राष्ट्राच्या सेवेसाठी प्राण समर्पित करा.

आम्ही ‘धर्म विजया’वर विश्‍वास ठेवतो ! – प.पू. सरसंघचालक

आम्ही ‘धन विजय’ आणि ‘असुर विजय’ अनुभवला आहे. पैसा जिंकणे म्हणजे वस्तूंमधून मिळणारा आनंद; पण यात हेतू योग्य नाही. हे आत्मकेंद्रित असल्यासारखे आहे.

माता अमृतानंदमयी, प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, योगी आदित्यनाथ आदी मान्यवर बँकॉकमध्ये होणार्‍या ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस’ला संबोधित करणार !

२४ ते २६ नोव्हेंबर या कालावधीत येथे ‘वर्ल्ड हिंदु काँग्रेस २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे. या तीन दिवसीय वैचारिक मेळाव्यासाठी जगभरातील विविध क्षेत्रांत कार्यरत हिंदूंना निमंत्रित करण्यात आले आहे.