ख्रिस्‍ती नववर्ष स्‍वागताच्‍या नावाखाली मुंबईत तरुणांचा धिंगाणा !

नववर्षाच्‍या स्‍वागतासाठी ठिकठिकाणी मध्‍यरात्री फटाके फोडण्‍यात आले. जुहू आणि खार येथे पबमध्‍ये रात्रभर पार्ट्या चालू होत्‍या. यांमध्‍ये सामाजिक अंतर, मास्‍कचा वापर आदी कोरोनाच्‍या नियमांची पायमल्ली करण्‍यात आली.

पोलिसांच्या साहाय्यानेच गुंडांनी रेस्टॉरंटवर आक्रमण केल्याची माहिती उघड : पोलीस निरीक्षक निलंबित

गुंडांना तोडफोडीसाठी साहाय्य करणारे कायदाद्रोही पोलीस अधिकारी ! अशा पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई पुरेशी नाही. त्यांना सेवेतून काढून टाकून त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट केला पाहिजे, तरच अन्य कुणी असे करू धजावणार नाही !

‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचण्यासाठी काँग्रेसचा दबाव !

एकीकडे ‘आतंकवादाला धर्म नसतो’ असे म्हणणार्‍या आणि दुसरीकडे ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनो, जाब विचारा !

पोलिसाकडून झालेल्या लैंगिक शोषणामुळे युवतीची आत्महत्या !

रक्षकच बनला भक्षक ! असे गुन्हेगार पोलीस कायदा आणि सुव्यवस्था काय राखणार ?

रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस कर्मचारी निलंबित

अशा धर्मांध पोलिसाला अटक करून बडतर्फच करणे अपेक्षित ! केरळमध्ये माकपचे आघाडी सरकार असल्याने या धर्मांधावर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्पच !

पीडितेलाच अपराधी समजणारी वागणूक आधी पालटायला हवी !

ज्या वेळी महिला अत्याचाराची घटना घडते, त्या वेळी संबंधित महिलेला मिळणारी वागणूक अयोग्य असते. तिला पोलीस ठाण्यामध्ये मिळणारी वागणूक पालटायला हवी. पीडित महिलेला अपराधी असल्याची वागणूक मिळणे चुकीचे आहे.

लुधियानातील न्यायालयात बाँबस्फोट करणारा पंजाब पोलीस दलातील बडतर्फ हवालदार गगनदीप सिंग असल्याचे उघड

लुधियाना येथील न्यायालयात झालेला बाँबस्फोट गगनदीप सिंग याने घडवला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पंजाब पोलिसांनी दिली. गगनदीप हा माजी पोलीस हवालदार असून त्याला अमली पदार्थांच्या तस्करीमुळे पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले होते.

गोव्यात रात्री १० वाजल्यानंतर ध्वनीक्षेपक लावण्यावरील बंदीआदेशाचे कठोरतेने पालन करण्याचे उच्च न्यायालयाचे प्रशासन आणि पोलीस यांना निर्देश

असे न्यायालयाने सांगावे लागणे पोलीस आणि प्रशासन यांना लज्जास्पद ! बंदीआदेश असतांना ध्वनीक्षेपक लावले जात असल्याचे पोलिसांच्या का लक्षात येत नाही ?

हलाल मांसविक्री करणार्‍या दुकानात राष्ट्रध्वजाचा ‘टॉवेल’ म्हणून वापर !

साम्यवाद्यांचे सरकार असलेल्या केरळ राज्यात धर्मांधांच्या विरोधात पोलिसांकडून कारवाई केली न जाणे, यात आश्‍चर्य ते काय ?

अशा पोलिसांना निलंबित करून त्यांची चौकशी करा !

रांची (झारखंड) येथे विहिंपचे पदाधिकारी मुकेश सोनी यांच्या हत्येच्या प्रकरणी खलारी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक फरीद आलम हेच मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप सोनी यांच्या नातेवाइकांनी केला आहे.