रा.स्व. संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी धर्मांध पोलीस कर्मचारी निलंबित

  • अशा पोलिसाला अटक करून त्याला नोकरीतून बडतर्फच करणे अपेक्षित आहे. केरळमध्ये माकपचे आघाडी सरकार असल्याने या धर्मांध पोलीस कर्मचार्‍यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता अल्पच आहे !
  • केरळमध्ये धर्मांध संघटनांचे जिहादी कार्यकर्ते हिंदुत्वनिष्ठांच्या जिवावर उठले आहेत. त्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोचली आणि त्याचा अपलाभ घेत या जिहाद्यांनी त्यांच्यावर आक्रमण केल्यास त्याला उत्तरदायी कोण ?

इडुक्की (केरळ) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्‍या सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या (एस्.डी.पी.आय.च्या) कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी पीके अनस या पोलीस कर्मचार्‍याला निलंबित करण्यात आले आहे.

कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी खबरदारीचा एक भाग म्हणून पोलिसांनी संघ कार्यकर्त्यांची माहिती गोळा केली होती. याच काळात एस्.डी.पी.आय. कार्यकर्त्याला एका प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्या वेळी अनाज याने ही माहिती त्या कार्यकर्त्याला दिली. या घटनेची चौकशी थोडुपुझा येथील उपअधीक्षकांनी केल्यावर अनाज हा दोषी आढळला. त्यानंतर त्याला निलंबित करण्यात आले आहे.