राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : २०.१२.२०२०

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

लाच स्वीकारणार्‍या पिंपरी येथील महिला पोलीस निलंबित

पुरुषांच्या समवेत आता महिलाही लाच घेण्यात कचरत नाहीत. यावरून समाजाचे किती अधःपतन होत आहे, हेच लक्षात येते !

बलात्काराचा गुन्हा नोंद असलेले निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांना अटक

स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनासाठी साहाय्य करीन, असे सांगत बंगल्यावर नेऊन वारंवार बलात्कार केल्याच्या प्रकरणी कडेगाव पोलीस पोलीस ठाण्याचे निलंबित पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस यांच्यावर २८ ऑगस्ट २०२० या दिवशी बलात्काराचा गुन्हा नोंद झाला होता.

कोरोना महामारीच्या काळात आधुनिक वैद्य आणि प्रशासन यांच्याविषयी आलेले वाईट अनुभव !

या लेखावरून भारतातील रुग्णांच्या संदर्भात किती केविलवाणी दशा आहे, हेच दिसून येते. अशा हलगर्जी आणि दायित्वशून्य प्रशासनाकडे सरकारने दुर्लक्ष न करता त्यांच्यावर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.

सागरी सुरक्षेतील आव्हाने आणि उपाय !

सागरी सुरक्षेसंबंधीच्या यंत्रणांनी आपसांत समन्वय साधून कार्य केल्यास देशाची सुरक्षा अबाधित राहू शकेल !

सिलीगुडी (बंगाल) येथे पोलिसांच्या लाठीमारात भाजपच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू !

बंगालमध्ये पोलीस कधी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार करतात का ? आणि केला, तर त्यात तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू होतो का ?

हप्तेखोरीच्या संभाषणाची ध्वनिफीत समोर आल्याने पोलीस अधिकारी अडचणीत !

जनतेचे रक्षकच बनले भक्षक ! लाचखोरीच्या प्रकरणात अडकलेले पोलीस जनतेला कायद्याचे काय मार्गदर्शन करणार ? अशा लाचखोर पोलिसांवर तात्काळ आणि कठोर कारवाई झाली पाहिजे !

गाजीपूर (देहली) येथे गोहत्या केल्यानंतर फेकलेले गायींचे शिर दाखवणारा व्हिडिओ प्रसारित

गोमाताद्रोही देहली पोलीस ! देहली पोलीस केंद्र सरकारच्या अखत्यारीत असतांना त्यांच्याकडून अशा प्रकारची निष्क्रीयता दाखवणे हिंदूंना अपेक्षित नाही !

मंगळुरू येथे आणखी एका ठिकाणी लष्कर-ए-तोयबा आणि तालिबान यांच्या समर्थनार्थ भिंतीवर लिखाण

पोलिसांनी पहिल्यांदा लिखाण करणार्‍यांवर कठोर कारवाई केली असती, तर पुन्हा दुसर्‍या ठिकाणी लिखाण झाले नसते ! आताही पोलीस निष्क्रीय राहिले, तर सर्वत्रच असे लिखाण करण्यात येऊ शकते !

भदोही (उत्तरप्रदेश) येथे पोलिसांनी मुलगी अल्पवयीन असल्याचे नाकारल्याने तिला पळवून नेणार्‍या धर्मांध तरुणाला जामीन

उत्तरप्रदेश सरकार एकीकडे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा बनवत आहे, तर दुसरीकडे पोलीस त्याला वाटाण्याच्या अक्षता लावत आहेत ! अशाने कधीतरी धर्मांधांवर वचक निर्माण होईल का ?