‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचण्यासाठी काँग्रेसचा दबाव !

  • माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन यांचा खळबळजनक गौप्यस्फोट !

  • मालेगाव बाँबस्फोटात पकडलेल्या पाकिस्तानी आणि स्थानिक मुसलमान यांना पुरावे असूनही सोडण्यास भाग पाडले !

एकीकडे ‘आतंकवादाला धर्म नसतो’ असे म्हणणार्‍या आणि दुसरीकडे ‘हिंदु आतंकवादा’चे कुभांड रचणार्‍या काँग्रेसवाल्यांना आता हिंदूंनो, जाब विचारा !

माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन

मुंबई – मालेगाव बाँबस्फोटात २ पाकिस्तानी आणि ८ स्थानिक मुसलमान यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरुद्ध सर्व पुरावेही होते; मात्र तत्कालीन सरकारने दबाव आणून त्यांना सोडण्याचा आदेश दिला. या वेळी हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित यांसह अन्य हिंदूंना बलपूर्वक पकडण्यात आले, असा खळबळजनक गौप्यस्फोट माजी अतिरिक्त पोलीस महासंचालक पी.के. जैन यांनी ‘आज तक’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. वर्ष २००८ मध्ये महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे सरकार होते अन् अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते.

२९ सप्टेंबर २००८ या दिवशी मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ झालेल्या बाँबस्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला, तर १०० हून अधिक जण घायाळ झाले होते. पी.के. जैन हे या प्रकरणातील अन्वेषण अधिकार्‍यांपैकी एक मुख्य अधिकारी होते. या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल पुरोहित, मेजर (सेवानिवृत्त) रमेश उपाध्याय, अजय रहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी अटक केले होती. सध्या हे सर्व जामिनावर बाहेर आहेत. या प्रकरणाची सुनावणी मुंबईमधील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या विशेष न्यायालयात चालू आहे. २९ डिसेंबर या दिवशी या प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी एका साक्षीदाराने ‘आतंकवादविरोधी पथकाचे तत्कालीन अधिकारी परमबीर सिंह यांनी या प्रकरणात योगी आदित्यनाथ यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंद्रेश कुमार, सुनील देवधर आणि काकाजी यांची नावे घेण्यास भाग पाडले’, अशी साक्ष न्यायालयात दिली आहे.

या साक्षीनंतर पी.के. जैन यांनी मुलाखतीमध्ये केलेल्या या गौप्यस्फोटामुळे या प्रकरणामागील हिंदुविरोधी कारस्थान पुढे येण्याची शक्यता आहे.