सुनावणीला मज्जाव करणे म्हणजे प्रसिद्धीमाध्यमांची मुस्कटदाबी ! – पत्रकार

खटल्याच्या सुनावणीला पत्रकारांना मज्जाव करणे, म्हणजे प्रसिद्धीमाध्यमांची मुस्कटदाबी असून एकप्रकारे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, असा अर्ज ११ पत्रकारांनी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयात केला आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या सुनावणीचे चित्रीकरण करावे ! – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

मालेगाव येथे वर्ष २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याच्या सुनावणीचे ध्वनीचित्रीकरण करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्आयएने) १ ऑगस्ट या दिवशी विशेष न्यायालयात करण्यात आली.

मालेगाव बॉम्बस्फोटाचा खटला आणखी किती कालावधी चालणार ? – मुंबई उच्च न्यायालय

यापुढे मालेगाव बॉम्बस्फोटाचे कामकाज कसे चालणार आहे आणि खटला आणखी किती कालावधी चालणार आहे, याचे स्पष्टीकरण न्यायालयाने राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे मागितले आहे.

कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करणे, हे काँग्रेसचे हिंदूंना आतंकवादी ठरवण्याचे षड्यंत्र ! – खासदार सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

‘समझौता एक्सप्रेस’मधील बॉम्बस्फोट प्रकरणात चिदंबरम् यांनी याविषयी स्वत:च्या हाताने ‘अ‍ॅफिडेविट’ सिद्ध केले. मालेगाव बॉम्बस्फोटातही हाच प्रकार करण्यात आला. कर्नल प्रसाद पुरोहित यांना केवळ पुढे करण्यात आले. हिंदूंना आतंकवादी ठरवण्यासाठी काँग्रेसने हे षड्यंत्र केले. – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

भाजपचे नेते डॉ. सुब्रमण्यम् स्वामी यांच्या हस्ते होणार कर्नल प्रसाद पुरोहित यांना न्याय देण्याची मागणी करणार्‍या संकेतस्थळाचे उद्घाटन

लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या समर्थनार्थ २९ जून या दिवशी दुपारी ३ वाजता मुंबई मराठी पत्रकार संघात ‘विराट हिंदुस्थान संगम’ ! या कार्यक्रमाला अधिकाधिक संख्येने उपस्थित राहून एका शूर सैन्य अधिकार्‍याला पाठिंबा दर्शवावा’, असे आवाहन या कार्यक्रमाचे समन्वयक अधिवक्ता एस्. बालकृष्णन् यांनी केले आहे.

न्यायालयातील असुविधेविषयी खासदार साध्वी प्रज्ञासिंह यांच्याकडून असंतोष व्यक्त

प्रकृती नीट नसतांनाही न्यायालयात बोलावले, तर बसायला नीट जागा तरी हवी. पाठीच्या त्रासामुळे बाकड्यावर (बेंचवर) बसू शकत नाही. खिडकीतील धुळीमुळे जंतूसंसर्ग होऊ शकतो. याचे दायित्व कोण घेणार ? गुन्हा सिद्ध झाल्यास हवे तर मला फासावर लटकवा…..

साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांना १ आठवडा सुनावणीला अनुपस्थित रहाण्याची सूट

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्आयएच्या) विशेष न्यायालयाने मालेगाव बॉम्बस्फोटाच्या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह, कर्नल प्रसाद पुरोहित आणि सुधाकर चतुर्वेदी यांना १ आठवडा सुनावणीला अनुपस्थित रहाण्याची सूट दिली आहे.

हेमंत करकरे यांची एटीएस प्रमुखपदी असतांनाची भूमिका चुकीची होती ! – लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन

हेमंत करकरे कर्तव्यावर असतांना त्यांचा मृत्यू झाल्याने ते हुतात्मा आहेत; मात्र त्यांची आतंकवादविरोधी पथकाचे (एटीएस) प्रमुख असतांनाची भूमिका चुकीची होती, असे विधान लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केले आहे.

काँग्रेसचे नेते सोनिया गांधी, अहमद पटेल, पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्या आदेशावरून आमच्यावर कारवाई ! – मेजर उपाध्याय

काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, पी. चिदंबरम्, सुशीलकुमार शिंदे आणि दिग्विजय सिंह यांच्या आदेशाननुसारच आमच्यावर कारवाई केली जात होती.

साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर खोटे गुन्हे नोंदवण्यात आले ! – भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा

हे ११ वर्षांनंतर अमित शहा का बोलत आहेत ? इतकी वर्षे ते का बोलले नाहीत ? जेव्हा साध्वी प्रज्ञासिंह आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ यांना अटक करण्यात आली, तेव्हा भाजप त्यांच्या पाठीशी ठामपणे का उभा राहिला नाही ?


Multi Language |Offline reading | PDF