सातारा येथे पाण्याचा अपव्यय केल्याने नळजोडण्या तोडल्या

सातारा नगरपालिकेच्या वतीने पाण्याचा अपव्यय करणार्‍यांच्या विरोधात पाणीपुरवठा विभागाने मोहीम उघडली असून गेल्या आठवडाभरात १६ नळजोडण्या तोडल्या. यामुळे पाणी वाया घालवणार्‍या नागरिकांचे धाबे दणाणले असून नागरिकांमध्ये जागृती होत आहे

मगनलाल फूड प्रॉडक्ट्स आस्थापनाने चिक्कीचे निकृष्ट उत्पादन केल्याप्रकरणी ५ लाख रुपयांचा दंड ! – मदन येरावार, राज्यमंत्री, अन्न आणि औषध प्रशासन

लोणावळा (जिल्हा पुणे) येथील मगनलाल फूड प्रॉडक्ट्स या आस्थापनाने चिक्कीचे निकृष्ट दर्जाचे उत्पादन केल्याप्रकरणाची अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने चौकशी केली.

राज्यात खोबरे आणि शेंगदाणा यांच्या तेल भेसळीप्रकरणी दोषींकडून ३ कोटी ५२ लाख रुपयांचा दंड वसूल ! – मदन येरावार, अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री

राज्यात खोबरे, शेंगदाणा आणि तीळ इत्यादी तेलांतील भेसळीप्रकरणी आतापर्यंत ९६३ नमुन्यांची पडताळणी केली असून यांतील दोषींकडून एकूण ३ कोटी ५२ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांनी २४ जूनला विधानसभेत प्रश्‍नोत्तरात दिली.

शेखर गोरे यांच्यासह तिघांची निर्दोष मुक्तता

माण तालुक्यातील खोपडे येथील विंड मिल या पवनचक्की प्रकल्पाकडे जाण्यासाठी बळजोरी करून, धमकावून जमिनीतून रस्ता काढल्याप्रकरणी वर्ष २०१३ मध्ये शेखर गोरे आणि अन्य दोन जणांना ३ वर्षे शिक्षेसह ११ सहस्र ५०० रुपयांचा दंड ठोठावला होता.

दाहोड (गुजरात) येथे पाणी वाया घालवणार्‍यांना २५० ते ५०० रुपये दंड !

देशभरात पाणीटंचाई जाणवत आहे. या पार्श्‍वभूमीवर कोणी पाणी वाया घालवत असल्याचे आढळल्यास त्याला दंड ठोठावण्याचा निर्णय गुजरातमधील दाहोड शहर पालिकेने घेतला आहे. देशात सर्वच ठिकाणी असा दंड लावला, तरच जनतेला पाणी वाचवण्याची शिस्त लागेल !

साध्वी प्रज्ञासिंह कथित आक्षेपार्ह विधानांवरून २१ घंट्यांचे मौन पाळणार

साध्वी प्रज्ञासिंह यांनी निवडणुकीच्या काळात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानांविषयी पुन्हा एकदा क्षमा मागत २१ घंट्यांचे मौन व्रत करणार असल्याचे घोषित केले आहे. साध्वी यांनी ट्विटरवर म्हटले….

रुग्णाच्या जेवणात कापसाचा बोळा : पुणे येथील जहांगीर रुग्णालयाला १ लाख रुपयांचा दंड

रुग्णांच्या आयुष्याशी खेळणारे रुग्णालय प्रशासन ! रुग्णालयाच्या उपाहारगृहाच्या स्वच्छतेची नियमित पडताळणी होत नाही का ? असा हलगर्जीपणा रुग्णांच्या जिवावर बेतला, तर त्याचे दायित्व कुणाचे ?

महिलेच्या अंगावर गरम कॉफी सांडल्यावरही तिला वैद्यकीय साहाय्य न करणाऱ्या ‘एमिरेट एअरवेज’ला ३ लाख ७१ सहस्र ३०० रुपयांचा दंड

‘एमिरेट एअरवेज’ या विमान आस्थापनेच्या विमानातून प्रवास करणाऱ्या  एका महिला प्रवाशाच्या अंगावर आस्थापनाच्या कर्मचाऱ्याकडून गरम कॉफी सांडली.

१ सहस्र आणि ५०० रुपयांच्या अनुमाने १ कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जप्त !

येथील जुन्या तहसील कार्यालय परिसरात १ सहस्र रुपये मूल्य असलेल्या आणि ५०० रुपयांच्या ९९ लक्ष ९७ सहस्र ५०० रुपयांच्या जुन्या नोटा पोलिसांनी जप्त केल्या. या प्रकरणी पोलिसांनी दत्तासिंग हजारे, रमेश पाटील, दीपक बाकले….

पिशवीसाठी ग्राहकांकडून ३ रुपये आकारणार्‍या ‘बाटा’ आस्थापनाला ९ सहस्र रुपयांचा दंड

येथील बाटाच्या एका दुकानात ग्राहकाने बूट खरेदी केल्यावर त्याला देण्यात आलेल्या पिशवीसाठीही ३ रुपये आकारण्यात आले. या पिशवीमुळे ‘बाटा’ आस्थापनाचेच विज्ञापन होणार होते.


Multi Language |Offline reading | PDF