डॉनल्ड ट्रम्प यांना फेडरल न्यायालयाने लैंगिक शोषण प्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ठोठावलेला दंड कायम ठेवला !

अमेरिकेचे नूतन राष्‍ट्राध्‍यक्ष डॉनल्‍ड ट्रम्‍प

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेतील फेडरल न्यायालयाने नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष (प्रेसिडेंट-इलेक्ट) डॉनल्ड ट्रम्प यांच्या विरोधातील लैंगिक शोषण प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाने ५० लाख डॉलर्सची (४२ कोटी ४१ लाख रुपयांची) भरपाई प्रकरणासंदर्भातील दिलेला निकाल कायम ठेवला आहे. त्यामुळे ट्रम्प २० जानेवारीला अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतरही त्यांच्या विरोधातील हा खटला न्यायालयात चालूच रहाणार आहे.

ट्रम्प यांनी ९० च्या दशकात न्यूयॉर्कच्या एका स्टोअरमधील कपडे पालटण्याच्या खोलीमध्ये महिला पत्रकार ई जीन कॅरोल यांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता.