पुणे – १ जानेवारीच्या मध्यरात्री पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई केली. १ जानेवारीच्या पूर्वसंध्येला वाहतूक पोलिसांनी २७ ठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची पडताळणी केली.
विशेष मोहिमेत वाहतुकीला अडथळा होईल, अशा पद्धतीने वाहने लावणार्या ९०२ जणांविरुद्ध गुन्हे नोंद करण्यात आले. शिरस्त्राण परिधान न केलेल्या २३, सिग्नल न पाळणार्या ११८, विरुद्ध दिशेने वाहन चालवणारे ६३२ आणि परवाना नसतांना वाहने चालवणार्या २३ जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. दुचाकीवरून ट्रिपल सीट (३ जण बसणेे) जाणार्या १७६, वाहन चालवतांना भ्रमणभाषवर बोलणार्या ४९, धोकादायक पद्धतीने वाहने चालवणार्या ५६ आणि वाहतुकीच्या नियमांचा भंग करणार्या ५५२ जणांविरुद्धही दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत २ सहस्र ६३३ वाहनचालकांना १९ लाख ८१ सहस्र ४५० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांनी दिली.