मालवण येथे अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटकातील ‘हायस्पीड ट्रॉलर’ला २५ लाख रुपयांचा दंड

प्रतिकात्मक छायाचित्र

मालवण – तारकर्ली येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्‍या कर्नाटक राज्यातील अतीजलद यांत्रिक नौकेवर (हायस्पीड ट्रॉलरवर) कारवाई करून नौकेच्या मालकाकडून २५ लाख ८७ सहस्र ५२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती येथील मत्स्य विभागाच्या अधिकार्‍यांनी दिली.

१९ ऑक्टोबर २०२४ या दिवशी पहाटे तारकर्ली येथील समुद्रात मत्स्य विभागाचे अधिकारी गस्त घालत असतांना कर्नाटक राज्याच्या जलधी क्षेत्रासाठी अनुज्ञप्ती असलेली ही यांत्रिक नौका महाराष्ट्रातील जलधी क्षेत्रात मासेमारी करत असतांना पकडण्यात आली होती. त्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग, सिंधुदुर्ग यांनी महाराष्ट्र मासेमारी सागरी नियमन अधिनियम १९८१ अंतर्गत कोकण विभागात एका ट्रॉलरवर केलेली ही आतापर्यंतची मोठी कारवाई आहे.