UttarPradesh SP MP Fined : संभल (उत्तरप्रदेश) येथील खासदार झिया उर रहमान बर्क यांना वीजचोरीच्या प्रकरणी १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड !

समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क

संभल (उत्तरप्रदेश) : येथील समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क यांच्यावर वीजचोरी प्रकरणी गुन्हा नोंदवल्यानंतर वीज विभागाने त्यांना १ कोटी ९१ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यांच्या घराची वीज जोडणी तोडण्यात आली आहे. तसेच खासदार बर्क यांच्या वडिलांच्या विरोधातही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार अखिलेश यादव यांनी बर्क यांची पाठराखण केली आहे. ‘सरकार मुसलमानांच्या घरांवर सातत्याने धाड टाकत आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या पक्षाच्या खासदारांच्या घरांवरही धाडी टाकाव्यात’, असे त्यांनी म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

केवळ दंड ठोठावू नये, तर त्यांना कारागृहात डांबले पाहिजे ! खासदार असतांना अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्ये करणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे !