RG Kar murder case : दोषी संजय रॉय याला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा

  • कोलकाता येथील महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या यांचे प्रकरण

  • पीडितेच्या कुटुंबियांना १७ लाख रुपये हानीभरपाई देण्याचाही आदेश

दोषी संजय रॉय

कोलकाता (बंगाल) – येथील राधा गोविंद कर रुग्णालयातील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याच्या प्रकरणी दोषी ठरवण्यात आलेल्या संजय रॉय याला सियालदह न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेप आणि ५० सहस्र रुपये दंड, अशी शिक्षा सुनावली. ‘हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मीळ नाही’, असे सांगत न्यायालयाने फाशीची शिक्षा देता येणार नाही, असेही या वेळी स्पष्ट केले.

न्यायालयाने पीडित महिला डॉक्टरच्या कुटुंबियांना १७ लाख रुपये हानीभरपाई देण्याचाही आदेश दिला; मात्र पीडितेच्या कुटुंबियांनी ‘आमची मुलगी आम्ही गमावली आहे. आम्हाला हानीभरपाई नको’ असे म्हटले आहे. ९ ऑगस्ट २०२४ ला या दिवशी बलात्कार आणि हत्या करण्याची घटना घडली होती.