अश्‍वगंधा औषधी वनस्पतीद्वारे कोरोनाचा विषाणू नष्ट होतो !

अश्‍वगंधाच्या रेणूमुळे ८७ टक्क्यांहून अधिक कोरोना विषाणू नष्ट करण्यास साहाय्य झाल्याचे संशोधनातून लक्षात आले. मानवी पेशींवरही या रेणूंची चाचणी यशस्वी झाली आहे.

जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते ! – जागतिक आरोग्य संघटना

कोरोना ही आता जागतिक आणीबाणी नसली, तरी याचा अर्थ असा नाही की, आता यापासून कोणताही धोका नाही. जगाने पुढील महामारीसाठी सिद्ध रहावे, जी कोरोनापेक्षाही धोकादायक असू शकते.

भारत हा विकसनशील आणि गरीब देशांचा नेता !

राजधानी पोर्ट मोरेस्बी येथे पापुआ न्यू गिनीचे पंतप्रधान जेम्स मारेप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरणस्पर्श करून स्वागत केले. यानंतर विमानतळावरच पंतप्रधान मोदींना ‘गार्ड ऑफ ऑनर’ (विशेष सन्मान) देण्यात आला.

समलैंगिकता हा घटनात्मक अधिकार नाही ! – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

मुळात समलैंगिकता हा चर्चेचा विषय असूच शकत नाही; कारण समलैंगिकता हा समाजातील काही वर्गाला ग्रासलेला रोग आहे. ज्याप्रमाणे कोरोना महामारीसाठी सरकारने लस आणली, त्याप्रमाणे या रोगाने ग्रासलेल्यांना इलाजाची आवश्यकता आहे.

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याचे प्रकरणी न्यायालयाने केली सर्वांची निर्दोष मुक्तता !

श्री देव भैरीची मिरवणूक काढल्याच्या प्रकरणी नागरिकांच्या दोषसिद्धीसाठी कोणताही सबळ, संयुक्त पुरावा न्यायालयापुढे ठेवण्यात आलेला नसल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. 

युरोपने शहाणे व्हावे !

युरोपने अमेरिकेच्या मागे स्वत:ची फरफट करून घेऊ नये, असे विधान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केल्यावर अमेरिकेला ते झोंबले आहे. ‘मॅक्रॉन हे जर संपूर्ण युरोपच्या वतीने बोलत असतील, तर अमेरिकेने केवळ चीनला रोखण्यावर लक्ष द्यावे आणि युक्रेनमधील युद्ध युरोपला हाताळू द्यावे’, अशी टीका एका अमेरिकन खासदाराने केली आहे.

सातारा जिल्‍ह्यात कोरोनामुळे एकाचा मृत्‍यू !

जिल्‍ह्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण हळूहळू वाढू लागले आहे. गत २४ घंट्यांत एका रुग्‍णाचा मृत्‍यू झाल्‍यामुळे धोका वाढला असून आरोग्‍य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी कोरोनाविषयी काळजी घ्‍यावी, असे आवाहन जिल्‍हा आरोग्‍य विभागाच्‍या वतीने करण्‍यात आले आहे.

कोरोना महामारीनंतर लहान मुलांच्या मानसिक समस्यांमध्ये वाढ !

मुलांच्या समस्या पाहिल्यास त्यांच्यावर लहानपणापासून साधनेचे संस्कार होणे आवश्यक वाटते ! त्यामुळे सरकारने मानसिक स्तरावरील उपायांसमवेत मुलांवर साधनेचे संस्कार होतील असे पहावे.

गुरुमाऊलीने धन्य धन्य मज केले ।

मग पांडुरंग हरि गुरुरूपात सामोरी आले ।जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्तच मज केले ।भावविश्‍वात स्थान त्यांनी दिले ।भावसत्संगात मज बोलाविले ।धन्य धन्य मज केले । धन्य धन्य मज केले ॥

बाह्य रुग्ण विभाग चालू होऊन १ घंट्यानेही आधुनिक वैद्य येईना !

शहरात संसर्गजन्य रोगांची साथ चालू आहे. कोरोना आणि एच् १ एन् १ संसर्गाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे; मात्र या आरोग्यकेंद्रात अतिशय
विदारक परिस्थिती दिसून आली. आधुनिक वैद्य १ घंट्यात न आल्याने रुग्णांना ताटकळत उभे रहावे लागते.