कॅनडाच्या अहवालातून माहिती उघड
ओटावा (कॅनडा) – फायझरच्या कोरोना लसीमध्ये कर्करोग निर्माण करणारा ‘सिमियन व्हायरस ४० (एस्व्ही४०) डी.एन्.ए. सीक्वेंस’ सापडला आहे. या डी.एन्.ए.विषयी फायझरने यापूर्वी काहीही खुलासा केला नव्हता, असे ‘हेल्थ कॅनडा’च्या अहवालात म्हटले आहे. शास्त्रज्ञांमध्येही या विषयावर चर्चा चालू झाली आहे. काहींचे म्हणणे आहे की, या डी.एन्.ए.मध्ये कर्करोग होण्याची क्षमता आहे, तर काहींच्या मते यापासून कोणताही धोका नाही, असे ‘पीटीआय’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे.
संपादकीय भूमिकाही माहिती जर खरी असेल, तर फायझर या विदेशी आस्थापनाने कोरोनावर लस काढून आणि ती लोकांना अशा प्रकारे घ्यायला लावून लोकांच्या जीव धोक्यात घातला आहे. अशा आस्थापनावर काय कारवाई होणार ? |