महर्षींच्या आज्ञेनुसार कर्नाटकमधील ‘संडूर’ येथे कार्तिकेयाच्या दर्शनासाठी गेल्यावर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
‘इलकल’ येथील सेवा लवकर झाल्यामुळे आम्ही तिथूनच ‘संडूर’ या गावी जाण्याचे ठरवले. रात्र होण्याच्या आधी आम्हाला तिथे पोेचायचे होते. ‘संडूर’ येेथील कार्तिकेयाचा डोंगर फार सात्त्विक आहे. येथे गेरू नावाच्या मातीचा डोंगर आहे. या डोंगरात खोदल्यावर आतमध्ये कार्तिकेयाचे पांढरे भस्म मिळते. हे भस्म हाताला अत्यंत मऊ लागते.