देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या पोचली ५२६ वर

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ५२६ झाली असून आतापर्यंत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. देशात सर्वाधिक म्हणजे १०१ रुग्ण महाराष्ट्रात आढळले असून त्यानंतर केरळमध्ये ९५ रुग्ण आढळले आहेत.

पुण्यातील पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी निगेटिव्ह

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या वाढत्या संख्येने पुण्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र येथे आढळलेल्या पहिल्या कोरोनाबाधित दांपत्याची चाचणी ‘निगेटिव्ह’ आली आहे.

… अन्यथा गंभीर पाऊल उचलावे लागेल ! – राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे

थोडा विलंब झाला आहे; मात्र शासनाने योग्य पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद करण्यात आली आहे. त्यासह देशांतर्गत चालू असलेली विमानसेवाही बंद करण्यात यावी, याविषयी माझे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले आहे.

जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कल्याण – डोंबिवलीतील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सोडून सर्व दुकाने ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हे आणि राज्ये यांच्या सीमा बंद करा ! – केंद्र सरकारचा आदेश

देशभरात दळणवळण बंदी केल्यामुळे सध्या विविध राज्यांतील परप्रांतीय कामगार स्वतःच्या मूळ गावी परत जात आहेत. अशा स्थलांतरित कामगारांद्वारे कोरोनाचे संभाव्य सामुदायिक संक्रमण होण्याची शक्यता लक्षात घेऊन ………