भारतात विरोधी पक्ष दुर्बल ! – श्री श्री रविशंकर

श्री श्री रविशंकर हे सध्या २ मासांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर आहेत. त्यानिमित्ताने झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी वरील प्रतिपादन केले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील बंदी ट्विटरने उठवली !

जानेवारी २०२१ मध्ये अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराला उत्तरदायी ठरवून ट्विटरकडून ट्रम्प यांचे खाते कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते.

तालिबानने ठार मारलेले भारतीय वृत्तछायाचित्रकार दानिश सिद्दिकी यांना ‘पुलित्झर पुरस्कार’ घोषित

भारतातील कोरोना मृतांची दाहकता दाखवणारी छायाचित्रे ही भावनिक जवळीक आणि विध्वंस दाखवणारी आहेत, असे ‘पुलित्झर’च्या संकेतस्थळावर या छायाचित्रांविषयी सांगण्यात आले आहे.

युक्रेनमध्ये सैन्य पाठवून तिसर्‍या महायुद्धाचा धोका पत्करायचा नाही ! – जो बायडेन

बायडेन पुढे म्हणाले की, सध्या जगात एकाधिकारशाही आणि लोकशाही यांच्यात युद्ध चालू आहे.

उत्तर कोरियाने आमच्यावर पुन्हा क्षेपणास्त्र डागले ! – दक्षिण कोरियाचा दावा

उत्तर कोरियाने पूर्वेकडील आमच्या अज्ञात परिसराला लक्ष्य करत पुन्हा एकदा क्षेपणास्त्र डागले, असा दावा दक्षिण कोरियाच्या सैन्याने केला. उत्तर कोरियाने आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी केली, असा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे.

मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत असल्याचे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे फुकाचे बोल !

जगभर ईद साजरी होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी, ‘जगभरात मुसलमान इस्लामद्वेषाचे बळी ठरत आहेत. अमेरिका अधिकाधिक सशक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; मात्र त्यांना अनेक धोके आहेत’, असे वक्तव्य केले.

भारताचे रशियासमवेतचे संबंध गरजेपोटी ! – अमेरिका

 ब्लिंकन म्हणाले की, अतिशय महत्त्वाची ठरण्याची आणि पुढील वाटचाल करण्यातील आधार बनण्याची क्षमता भारत-अमेरिका यांच्यातील भागीदारीत आहे.

भारतात धार्मिकतेच्या आधारे भेदभाव होतो !

भारतात नाही, तर इस्लामी देशांत धार्मिकतेच्या आधारे भेदभावच नाही, तर वंशसंहार केला जातो, हे अमेरिकेतील संस्थांना दिसत नाही कि ते त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहेत ?

अब्जाधीश इलॉन मस्क यांनी अंतत: विकत घेतले ट्विटर !

खरेदी करार अंतिम झाल्यानंतर मस्क यांनी ‘भाषण स्वातंत्र्या’चे समर्थन करणारे ट्वीट केले. लोकांचे भाषणस्वातंत्र्य अबाधित रहावे, हा ट्विटर विकत घेण्यामागील उद्देश होता, असे त्यांनी नमूद केले.

युद्धाचा उद्देश पूर्ण करण्यात रशिया अपयशी ! – अमेरिका

रशियाने ज्या उद्देशाने युद्ध चालू केले होते, तो उद्देश पूर्ण करण्यात रशियाला अपयश आले आहे, तर त्याच वेळी युक्रेन त्याच्या उद्देशात यशस्वी झाला आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी केले.