Resolution On Holi In Texas : अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सिनेटमध्ये होळीला मान्यता देणारा ठराव संमत !

टेक्सास राज्यातील सिनेट

ऑस्टिन (अमेरिका) – अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील सिनेटमध्ये हिंदु सण होळीला सांस्कृतिक उत्सव म्हणून मान्यता देणारा ठराव संमत करण्यात आला आहे. त्यामुळे होळीला औपचारिक मान्यता देणारे टेक्सास हे अमेरिकेतील तिसरे राज्य बनले आहे. टेक्सासपूर्वी जॉर्जिया आणि न्यूयॉर्क यांनी होळीला सांस्कृतिक उत्सव म्हणून मान्यता दिली आहे.

१. होळीला मान्यता देणारा प्रस्ताव टेक्सास सिनेटमध्ये सिनेटर सारा एकहार्ट यांनी मांडला. या ठरावात होळीचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

‘वाईटावर चांगल्याचा विजय’, असा सण म्हणून होळीचे वर्णन करण्यात आले. या ठरावात टेक्सासमधील सामुदायिक संबंध सशक्त करण्यात आणि सांस्कृतिक विविधता समृद्ध करण्यात होळीची भूमिका अधोरेखित करण्यात आली.

२. ह्युस्टनमधील भारतीय महावाणिज्य दूत मंजुनाथ यांनी टेक्सासने होळीला मान्यता दिल्याविषयी आनंद व्यक्त केला. ‘हिंदु अमेरिकन फाऊंडेशन’नेही या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याविषयी टेक्सास सिनेटचे आभार मानले आहेत. फाऊंडेशनने म्हटले आहे की, टेक्सास सिनेटने टेक्सासमधील भारतीय अमेरिकन समुदायाच्या वाढत्या सांस्कृतिक योगदानाची  दखल घेतली आहे.