दळणवळण बंदीच्या काळात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने कह्यात घेतली ११७ एकर भूमी !

देवस्थानाला भाविकांनी श्रद्धेने दिलेल्या भूमीविषयी असा गैरकारभार हे सरकारीकरणाचे दुष्परिणाम आहेत. म्हणून मंदिरे भक्तांच्या कह्यात हवीत !

म्यानमारमध्ये सैन्याकडून सत्तापालट !

म्यानमारचे राष्ट्रपती विन म्यिंट, सत्ताधारी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू की यांना सैन्याकडून अटक करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीला धाड टाकून ही कारवाई करण्यात आली. देशात एका वर्षासाठी आणीबाणी घोषित केली आहे.

(म्हणे) ‘आजचा हिंदु समाज हा पूर्णतः सडला असून भारतात मुसलमानांवर अन्याय होत आहे !’

एल्गार परिषदेत अलिगढ मुस्लिम विद्यापिठातील विद्यार्थी शरजील उस्मानी याची हिंदुद्वेषी गरळओक : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात कोणीही येऊन हिंदूंची अपकीर्ती करून जातो आणि त्याच्यावर कारवाई होत नाही, हे संतापजनक नाही का ?

‘ओटीटी’ माध्यमावरील आशय नियंत्रणात ठेवण्यासाठी नियमावली करणार ! –  प्रकाश जावडेकर

वास्तविक सरकारने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या आणि राष्ट्रविरोधी असणार्‍या वेब मालिकांवर स्वतःहून कारवाई करत त्यांच्यासाठी कडक नियमावली लागू करणे आवश्यक होते !

 मुख्य आरोपी ज्योत्स्ना शिंदे यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची शिवसेनेची मागणी

पुण्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरण
अशी मागणी का करावी लागते ? प्रशासन स्वतःहून चौकशी का करत नाही ?

पुणे महापालिकेचा ५ अरुंद रस्त्यांवरही सायकल मार्ग विकसित करण्याचा घाट

पूर्वी चालू केलेली सायकल योजना बंद का पडली, याचा अभ्यास महापालिकेने करणे अपेक्षित आहे.

समर्थ रामदासस्वामी यांच्या चित्ररथाचा समावेश देहली येथील संचलनात न केल्याने निषेध

देहली येथे झालेल्या संचलनातील चित्ररथात महाराष्ट्रातील संतांसमवेत संत रामदासस्वामी यांना स्थान न दिल्याने आम्हा भाविकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत.

कोरोना साथीच्या काळात सामान्य नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यात पुणे महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेला अपयश !

आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरवण्याचे दायित्व महापालिकेवर असतांना त्या पुरवू न शकणे हा अक्षम्य अपराध आहे.

बारामतीतील शासकीय आणि खासगी कार्यालये, रुग्णालये यांच्या अग्नीशमन यंत्रणेची दुरवस्था

आगीसारख्या जीवघेण्या समस्येविषयी शासकीय रुग्णालये आणि कार्यालये येथील अधिकारी निष्काळजी असतील, तर संबंधितांंना कठोर शिक्षाच होणे अपेक्षित आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कार्यक्रमांचे नियमन करण्यासाठी मार्गदर्शक सूचना देणार ! – केंद्र सरकार  

‘ओटीटी’ अ‍ॅप्सवर आतापर्यंत अनेक वेब सिरींजमधून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान केला गेला आहे.