‘ओटीटी’ अॅप्सवर आतापर्यंत अनेक वेब सिरींजमधून हिंदूंच्या देवता, राष्ट्रपुरुष, भारतीय वायूदल आदींचा अवमान केला गेला असतांना केंद्र सरकारने यापूर्वीच त्यावर नियमन करणे अपेक्षित होते, असे हिंदूंना वाटते !
नवी देहली – ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही वेब सिरीजविरुद्ध अनेक तक्रारी आल्या आहेत. ओटीटीवर प्रदर्शित केलेले चित्रपट आणि मालिका, डिजिटल वर्तमानपत्रे, केबल टेलिव्हिजन नेटवर्क (रेग्युलेशन) अॅक्ट किंवा केंद्रीय चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या (‘सेन्सॉर बोर्डा’च्या) कार्यक्षेत्रात येत नाहीत. त्यामुळे लवकरच या सर्वांचे नियमन करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली.