देहलीतील इस्रायली दूतावासाजवळील बॉम्बस्फोटासाठी सैन्य वापरत असलेल्या स्फोटकाचा वापर

इस्रायलच्या दूतावासाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटासाठी ‘पी.ई.टी.एन्.’ प्रकारची स्फोटके वापरण्यात आल्याचे सुरक्षादलातील सूत्रांनी सांगितले. ही स्फोटके सैन्याकडून वापरली जाणारी स्फोटके आहेत.

देहलीमधील हिंसाचारामध्ये राष्ट्रध्वजाचा अपमान ! – पंतप्रधान मोदी

ही घटना राष्ट्रध्वजाचा अपमान करणारी आहे. या घटनेने देश अतिशय दु:खी आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ मध्ये केले; मात्र त्यांनी शेतकरी आंदोलनाचा कुठलाही उल्लेख केला नाही.

यवतमाळ येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त गोळा झालेले राष्ट्रध्वज शासनाला सुपुर्द !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २६ जानेवारी या दिवशी शहरातील विविध भागांमध्ये ‘राष्ट्रध्वज सन्मान पेटी’ फिरवण्यात आली. त्यात खराब झालेले, खाली पडलेले आणि नागरिकांनी दिलेले राष्ट्रध्वज गोळा करण्यात आले.

ऐतिहासिक वास्तू, दुर्ग आणि गड पर्यटकांसाठी खुले ! – दौलत देसाई, जिल्हाधिकारी, कोल्हापूर

जिल्ह्यातील प्रतिबंधक क्षेत्र वगळून जिल्ह्यातील ऐतिहासिक वास्तू, दुर्ग, किल्ले, स्मारके, संग्रहालये पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले आहेत.

अनंतनागमध्ये ६ आतंकवाद्यांना शस्त्रसाठ्यासह अटक

आतंकवाद्यांना पोसण्याऐवजी त्यांना फाशीची शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

कॅसिनोंमुळे राज्यशासनाला मागील ९ वर्षांत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त

कॅसिनोंमुळे राज्यशासनाच्या तिजोरीत १ सहस्र २२७ कोटी रुपयांचा महसूल गोळा झाल्याची माहिती शासकीय सूत्रांनी दिली. तरंगत्या कॅसिनोंमुळे ७८५ कोटी ५२ लाख रुपये, तर भूमीवरील कॅसिनोंमुळे ४९१ कोटी ७६ लाख रुपये राज्यशासनाला मिळाले.

उच्च न्यायालयाचा आदेश असतांनाही कृषीभूमीविषयी प्रशासन उदासीन का ? – ग्रामस्थांचा प्रश्‍न

गत २५ वर्षे नवीन कुर्ली गावात सहस्रो लोक वास्तव्य करत आहेत. ग्रामपंचायत नसल्याने त्यांना शासकीय कामांसाठी लागणारे दाखले मिळत नाहीत. गावातील रस्ते, वीज आणि पाणी या मूलभूत आवश्यकतांसाठी शासनाकडून निधी मिळत नाही.

गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला जवेली खुर्द येथे ५७ वर्षानंतर प्रथमच निवडणूक पार पडली !

नक्षलवाद समूळ नष्ट करण्यासाठी सरकार कधी पावले उचलणार ?

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी शनिशिंगणापुरच्या मंदिरात केली ग्रहशांती

अंधश्रद्धाविरोधी कायदा होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसही प्रयत्न करत होती. त्यांच्या मंत्र्याने केलेली ग्रहशांती पक्षाला चालते का ?

मध्यप्रदेशातील सर्व सरकारी कार्यालयांच्या स्वच्छतेसाठी गोमूत्रापासून बनवलेल्या गो-फिनाईलचा वापर करण्यात येणार !

काँग्रेसने देशात सत्तेत असतांना सर्वच क्षेत्रात इतकी अस्वच्छता निर्माण करून ठेवली आहे ती स्वच्छ करायला गो-फिनाईलच उपयोगी पडणार आहे, असेच राष्ट्रप्रेमींना वाटेल !