आंतरराष्ट्रीय ख्यातीची पॉप गायिका रिहानाकडून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा

शेतकरी आंदोलनावर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा घडवून भारताची प्रतिमा मलीन करण्याचे हे षड्यंत्र आहे. यासाठी सरकारने स्वतःची बाजू जोरकसपणे मांडून आंदोलनात घुसलेल्या समाजविघातक घटकांची माहिती समोर आणणे आवश्यक !

संपूर्ण देशात धर्मांतरविरोधी कायदा करण्याचा विचार नाही ! – केंद्र सरकार

केंद्रातील सरकार जर असा कायदा करणार नसेल, तर हिंदूंचे विविध मार्गांनी होणारे धर्मांतर कोण रोखणार, याचे उत्तर कोण देणार ?

बीड येथे ठेकेदाराकडून रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याची स्थानिकांची मागणी

तालुक्यातील घारगाव ते अंजनवती या ६ ते ७ किलोमीटर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. याविषयी अनेक वेळा तक्रार करूनही संबंधित विभाग आणि जिल्हा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहेत.

राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यास शासनाची अनुमती

राज्यातील ऊस गाळप हंगामाचे कारण पुढे करत ३ मासांसाठी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. ही स्थगिती राज्य सरकारने २ फेब्रुवारीला मागे घेतली आहे.

नागपूर येथील हुतात्मा सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य

जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने येथील हुतात्मा सैनिक भूषण सतई यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपयांचे साहाय्य शासनाच्या वतीने देण्यात आले. २ मासांपूर्वी काश्मीर खोर्‍यात झालेल्या आक्रमणात भूषण सतई हुतात्मा झाले होते.

केंद्र सरकारने पुढाकार घेऊन राष्ट्र-धर्मविरोधकांवर कठोर कारवाई करावी ! – पायल रोहतगी, अभिनेत्री

‘चर्चा हिंदु राष्ट्र्राची !’ या विशेष संवादांतर्गत ‘ईशनिंदाविरोधी कायद्याची मागणी का ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ परिसंवाद

मिरजेतील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करा ! – अधिवक्त्या (सौ.) स्वाती शिंदे, भाजप, महिला मोर्चा

‘‘मुलगी शाळेत जात असतांना तिला धमकावून, गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्या प्रकरणी एका संशयितास अटक केली असून इतर आरोपींना अटक झालेली नाही.’’

बाजारातील ५० टक्के खाद्यतेल भेसळयुक्त !

खाद्यतेलात सध्या मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन विभागाला मिळाली. त्यानुसार व्यापक स्वरूपात ३० अन्न सुरक्षा अधिकारी यांचा समावेश असलेल्या या पथकाने बोरिवली, गोरेगाव, वाशी, मीरारोड, वसई, भिवंडी, पालघर अशा ठिकाणी तेल विक्री करणार्‍या आस्थापनांवर धाडी टाकल्या.

नांदेड येथे वन विभाग आणि मनरेगा यांच्या कामात बनावट कामगार दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

जिल्ह्यातील भोकर विधानसभा मतदारसंघातील चिदगिरी ग्रामपंचायतीमध्ये वनविभागाच्या मनरेगा आणि सामाजिक वनीकरण यांच्या विविध कामांत बनावट कामगार दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करण्यात आला आहे.

तरंगत्या ६ कॅसिनोंकडून कचरा विल्हेवाटीसंबंधीच्या नियमांचा भंग !

नद्यांचे प्रदूषण करून शासनाला महसूल मिळवून देणारे कॅसिनो !