मुंबई साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना गुजरात येथे अटक !

वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना अटक

मुंबई – गुजरातमधील आतंकवादविरोधी पथकाने वर्ष १९९३ मधील साखळी बाँबस्फोटातील ४ आरोपींना अटक केली आहे. आतंकवादविरोधी पथकाडून या आरोपींची कसून चौकशी करण्यात येत आहे. हे वृत्त ‘ए.एन्.आय्.’ वृत्तसंस्थेकडून देण्यात आले आहे.

मुंबई साखळी बाँबस्फोटातील मुख्य सूत्रधार अबू बकर याला फेब्रुवारी २०२२ मध्ये भारतीय अन्वेषण यंत्रणेने संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथून अटक केली होती. अबू बकर याच्या अटकेनंतर या चार आतंकवाद्यांना पकडून आणखी मोठे यश अन्वेषण यंत्रणेला मिळाले आहे. साखळी बाँबस्फोटात मुंबईतील १२ ठिकाणी करण्यात आलेल्या बाँबस्फोटात २५७ जण ठार झाले, तर ७१३ जण घायाळ झाले होते.