महाराष्ट्र विधानसभा हिवाळी अधिवेशन २०२३
गृहमंत्र्यांकडून विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशीची घोषणा !
नागपूर, १५ डिसेंबर (वार्ता.) : वर्ष १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटातील मुख्य आरोपी सलीम कुत्ता यांच्यासमवेत उद्धव ठाकरे गटाचा नाशिक महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर याने मेजवानी केल्याचा खळबळजनक आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी माहितीच्या सूत्राच्या अंतर्गत विधानसभेत केला. यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘या प्रकरणात कोण कोण सहभागी आहेत ?’ याची विशेष पोलीस पथकाद्वारे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची घोषणा केली.
१९९३ चा बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद इब्राहिम चा हस्तक सलीम कुत्ता त्याच्या समवेत उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) नेता पार्ट्या करतो. देशद्रोही असलेल्या आणि पॅरोलवर जेलमधून बाहेर असलेल्या सलीम कुत्ता सोबत हितसंबंध ठेवतो. या लोकांचा पॉलिटिकल गॉडफादर कोण आहे. त्याचा शोध घ्यावा. एसआयटी… pic.twitter.com/nR4VcdeBBF
— nitesh rane (@NiteshNRane) December 15, 2023
याविषयीची माहिती देतांना आमदार रितेश राणे सभागृहात म्हणाले,…
१. मुंबई बाँबस्फोटात २५७ निरपराध लोकांचा मृत्यू झाला, तर ७०० हून अधिक नागरिक घायाळ झाले. दाऊद याचा साथीदार सलीम कुत्ता हा ‘पॅरोल’ (कारागृहात शिक्षा भोगणार्या गुन्हेगाराला सहानुभूतीपूर्वक तत्त्वावर काही कालावधीसाठी कारागृहाच्या बाहेर सोडणे) वर बाहेर असतांना त्याने सुधाकर बडगुजर याच्यासमवेत मेजवानी केली. याचा व्हिडिओ माझ्याकडे उपलब्ध आहे.
२. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवावर उठलेल्या दाऊदच्या हस्तकासमवेत मेजवानी करणारे बाळासाहेबांचे नाव घेण्याच्या योग्यतेचे नाहीत. बडगुजर याचा ‘गॉडफादर’ कोण ? याचे अन्वेषण करावे, तसेच तो कुणाच्या संपर्कात होता, याचे अन्वेषण करून दोषींवर कारवाई करावी.
दोषींची चौकशी करून दोषींवर कारवाई करू ! – देवेंद्र फडणवीससलीम कुत्ता हा मुंबई बाँबस्फोटातील आरोपी आहे. तो ‘पॅरोल’वर कारागृहाच्या बाहेर आला होता. बडगुजर याचा सलीम कुत्ता याच्याशी काय संबंध आहे ? या मेजवानीत कोण कोण होते ? कुणाच्या पाठबळाने हे झाले ?
याची चौकशी करण्यात येईल. बाँबस्फोटातील आरोपींसमवेत मेजवानी करणे हे संवेदशीलता मृत पावल्याचे लक्षण आहे. |
अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतो ? याची चौकशी व्हावी ! – दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री
दाऊद हा भारताचा एक क्रमांकाचा शत्रू आहे. सलीम कुत्ता हा दाऊद याचा ‘शार्पशूटर’ आणि उजवा हात होता. वर्ष १९९३ मध्ये शिवसेनाभवन उडवण्याचाही त्यांचा कट होता. सुधाकर बडगुजर हा काही वर्षांत शेकडो कोटी रुपयांचा मालक झाला आहे. देशद्रोही लोकांसमवेत मेजवानी करणे गंभीर आहे. या प्रकरणाच्या खोलात जाऊन अतिरेक्यांना पैसा कोण पुरवतो ? याचे अन्वेषण करावे. यामध्ये पुरावे नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी.
अशा घटना आतंकवादाला खतपाणी घालणार्या आहेत ! – आमदार आशिष शेलार, भाजप
देशावर आक्रमण करून निष्पाप लोकांना मारणार्या कटातील आरोपीसमवेत मेजवानी करणार्यांना हिंदुत्वाविषयी बोलण्याचा अधिकार नाही. अशा लोकांवर पक्षाच्या अंतर्गतही कारवाई करण्यात यावी. असे प्रकार आतंकवादी कारवायांना खतपाणी घालणारे आहेत.