रेवस (रायगड) ते रेडी (सिंधुदुर्ग) सागरी महामार्ग पूर्ण होण्यास आणखी ३ वर्षे लागणार !
मागील ३० वर्षे प्रलंबित असलेला रेवस ते रेडी हा सागरी महामार्ग पूर्ण व्हायला आणखी ३ वर्षे लागतील, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी २५ मार्च या दिवशी सभागृहात दिली.