
१. ‘गेल्या साडेतीन वर्षांपासून मी ‘सनातन संस्थे’च्या मार्गदर्शनानुसार साधना करत आहे. ‘सनातन संस्थे’च्या वतीने घेण्यात येणार्या सत्संगात सांगितल्याप्रमाणे मी नामजप करणे, स्वयंसूचनांची सत्र करणे असे व्यष्टी साधनेचे प्रयत्न करत आहे.
२. गेल्या मासात मला काही साधकांना भेटण्याची संधी मिळाली. त्या वेळी मला परात्पर गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले) यांचा छायाचित्रमय जीवनदर्शन ग्रंथ मिळाला. ‘हा ग्रंथ मला मिळावा’, यासाठी मी पुष्कळ आतुर होते.
३. साधकांनी मला जतन केलेले दैवी कण दाखवून त्यामागील अध्यात्मशास्त्र समजावून सांगितले.
४. त्यानंतर मी व्यष्टी आणि समष्टी साधनेला अधिक उत्साहाने आरंभ केला.
५. छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ उघडून प्रार्थना करतांना हातात पुष्कळ ऊर्जा आणि उष्णता जाणवणे
स्वयंसूचना घेण्यास आरंभ करण्यापूर्वी मी परात्पर गुरुदेवांचा छायाचित्रमय जीवनदर्शन हा ग्रंथ उघडला. त्यातील परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे पाहून मी प्रार्थना केली. प्रार्थना करतांना मी माझे हात नमस्काराच्या मुद्रेत ठेवले होते. त्या वेळी मला माझ्या हातात पुष्कळ ऊर्जा आणि उष्णता जाणवत होती. या ऊर्जेमुळे माझे हात आपोआपच उघडत होते. काही वेळानंतर मी जेव्हा पुन्हा स्वयंसूचना सूचनासत्र करत होते, तेव्हा मला वरीलप्रमाणेच अनुभूती येत होती.
६. स्वयंसूचनांचे सत्र करतांना हातांवर दैवी कण येणे
२ घंट्यांनंतर पुन्हा मी सूचनासत्र करू लागले. सूचनासत्र करण्यास आरंभ करण्यापूर्वी मी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी हातावर कापूर ठेवत असतांना मला माझ्या हातावर पुष्कळ दैवी कण आढळले.
७. दैवी कण पाहून मला परात्पर गुरुदेवांच्या चरणी पुष्कळ कृतज्ञता वाटत होती. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच आज मला पुष्कळ भाववस्था अनुभवता आली.’
– एक जिज्ञासू (२.२.२०२२)