पिंपरी कुदळवाडीतील २२२ अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, गोदामांवर हातोडा !

अनधिकृत बांधकामे, पत्राशेड, गोदामांवर हातोडा

पिंपरी (जिल्हा पुणे) – चिखली, कुदळवाडीतील अनधिकृत बांधकामे, पत्राशेड काढून घेण्यासाठी व्यावसायिकांना दिलेली ६ दिवसांची मुदत संपल्यानंतर महापालिका प्रशासनाने ८ फेब्रुवारीला दिवसभर कारवाई केली. महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने पहिल्या दिवशी ४२ एकर क्षेत्रफळावरील १८ लाख ३६ सहस्र ५३२ चौरस फुटावरील २२२ बांधकामे भुईसपाट केली. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने संयुक्तरित्या अतिक्रमण कारवाई राबवली.