
कोल्हापूर : आप्पाचीवाडी येथील श्री हालसिद्धनाथ देवस्थान आणि आदमापूर येथील सद्गुरु बाळूमामा देवस्थान येथील मुख्य भाकणूकदार बाबूराव कृष्णा डोणे महाराज (वय ७० वर्षे) यांनी वाघापूर (तालुका भुदरगड) या मूळगावी ९ फेब्रुवारीला देहत्याग केला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुले, ३ सुना, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी आकाशवाणी, दूरचित्रवाणी, तसेच विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून धनगरी ओव्या, गीते, तसेच भाकणुकीच्या माध्यमातून जगात भविष्यात घडणार्या अनेक घडामोडी लोकांपर्यंत पोचवल्या होत्या. भाकणूककार पू. कृष्णा डोणे महाराज यांचे ते वडील होत.