गोवा : मुरगाव आणि सासष्टी पाठोपाठ सांगे येथेही शिधापत्रिकाधारकांना बुरशीजन्य तांदुळाचे वितरण

यापूर्वी तूरडाळीचे प्रकरण राज्यात गाजले होते. या प्रकरणाला १० मास उलटूनही त्याचा सोक्षमोक्ष लागलेला नाही. ‘बुरशीजन्य तांदुळाच्या वितरणाच्या चौकशीचेही असेच होणार का?’, असा प्रश्न स्वस्त धान्य दुकानदारांना पडला आहे.

जारमधून पिण्‍याच्‍या पाण्‍याची विक्री करण्‍यासाठी यापुढे सरकारची अनुमती लागणार !

यापुढे जारमधून पाणी विकण्‍यासाठी अन्‍न आणि औषध प्रशासन विभागाची अनुमती घ्‍यावी लागणार आहे.

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे ! – अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)

बाणावली येथील स्वस्त धान्य दुकानातील २३ सहस्र किलो तांदूळ आणि ६ सहस्र किलो गहू गायब

गोवा सरकारने ३ मासांहून अधिक कालावधीसाठी शिधा न नेणार्‍यांचे शिधापत्रक रहित करण्यात येणार, असे घोषित केल्यामुळे शिधापत्रिका धारकांनी शिधा नेण्यास प्रारंभ केला आहे; मात्र दुकानांमध्ये धान्य उपलब्ध नसल्याने प्रकार उघडकीस आला.

गरिबांना विलंबाने शिधा पोचवणार्‍या कंत्राटदारांकडून ६ कोटी ५१ लाखांचा दंड वसूल ! – रवींद्र चव्हाण, मंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. त्या वेळी ते बोलत होते.

गोवा : नागरी पुरवठा खात्याचे तत्कालीन संचालक सिद्धिविनायक नाईक निलंबित

नासाडी झालेल्या तूरडाळीची किंमत सुमारे २ कोटी ८६ सहस्र रुपये होते, तसेच सुमारे १० टन साखरेची नागरी पुरवठा खात्याच्या गोदामात नासाडी झाली.

मौजे पाभळ (जिल्हा यवतमाळ) येथील शिधावाटप दुकानावर निलंबनाची कारवाई ! – छगन भुजबळ, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री

दुकानावर केवळ निलंबनाची कारवाई करून न थांबता जनतेची असुविधा झाल्याविषयी त्यांना शिक्षाही होणे अपेक्षित आहे !

अनेक नामांकित आस्थापनांचे मध अल्प दर्जाचे आणि भेसळयुक्त असल्याची अन्न आणि औषध प्रशासन मंत्र्यांची विधान परिषदेत स्वीकृती !

भेसळयुक्त मधाची निर्मिती करणार्‍या आस्थापनांवर कारवाई करण्याविषयी शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला डॉ. शिंगणे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील स्वीकृती दिली.

नागपूर येथे सडक्या शेंगदाण्याला रंगवून ‘पिस्ता’ म्हणून विकणार्‍यांवर कारवाई !

राजरोजपणे अनेक मास चालू असलेली भेसळ प्रशासनाला कशी समजत नाही ? प्रशासनाने जनतेच्या आरोग्याचा विचार करून अशा घटना घडू नयेत, यासाठी प्रयत्न करायला हवेत.

गूळ आणि साखरेच्या ९ सहस्र ६२८ किलो साठ्यासह १० लाख रुपयांचा गुटखाही शासनाधीन !

परिमंडळ ५ चे साहाय्यक आयुक्त (अन्न), अन्नसुरक्षा अधिकारी श्रीमती बारवकर आणि रा.भि. कुलकर्णी यांच्या पथकाने गुटका विक्रेत्याकडून १० लाख ४४ सहस्र ४०० रुपयांच्या साठ्यासह ७ लाख रुपये किमतीचे वाहनसुद्धा शासनाधीन केले आहे.