१४ कोटी लोक अन्न सुरक्षा कायद्यापासून वंचित ! – सोनिया गांधी

खासदार सोनिया गांधी

नवी देहली – सप्टेंबर २०१३ मध्ये आमच्या सरकारने सादर केलेला राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा देशाच्या १४० कोटी लोकसंख्येसाठी अन्न आणि पोषण सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एक ऐतिहासिक उपक्रम होता. अद्यापही १४ कोटी लोक कायद्याच्या बाहेर आहेत. त्यांना या कायद्याच्या कक्षेत आणले पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या खासदार सोनिया गांधी यांनी राज्यसभेत केली.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे राज्य असतांना लोकांचा कुपोषणामुळे मृत्यू होत होता. त्या तुलनेत आता सरकारकडून विनामूल्य धान्य मिळत आहे. याचे कधी सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे का ?