शिवाजीनगर पोलीस वसाहतीतील इमारतीमधील वीजदेयक प्रशासनाने न भरल्याने पाणीपुरवठा खंडित !

शिवाजीनगर पोलीस वसाहतीमधील २२ मजली इमारतीमध्ये पाणीपुरवठा खंडित केला आहे. २२ मजली इमारतीमध्ये पाणीपुरवठा, लिफ्ट (उद्वाहक) आणि वापरातील जागेत बसवलेल्या दिव्यांसाठी ३ वीज मीटर बसवले आहेत.

सातारा नगरपालिकेकडून ५ कोटी ४४ लाख रुपयांचा महसूल जमा !

एवढी थकबाकी का रहाते ? प्रत्येक वर्षी वसुली पूर्ण होण्याचे ध्येय प्रशासनाने घेणे आवश्यक आहे !

बनावट अध्यादेश काढून वेतनवाढ मिळवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद !

पुणे येथील जिल्हा शिक्षण मंडळातील विविध माध्यमिक शाळांमधील ५० अपदवीधर कला शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणीचा लाभ मिळवून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून गुन्हा नोंद करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाची सुटका : जालना जिल्ह्यातून ५ आरोपी अटकेत !

२ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा ७ वर्षीय मुलगा चैतन्य याचे चारचाकीमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी घटनेच्या १५ मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही घटना उघड झाली.

व्यक्ती-स्वातंत्र्यवाल्यांचे अज्ञान !

‘व्यक्तीस्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्या मनाप्रमाणे वागणारे वैद्यकीय, न्यायालयीन इत्यादी एकाही क्षेत्रात आपल्या मनाप्रमाणे वागत नाहीत. केवळ आध्यात्मिक परंपरांसंदर्भात मनाप्रमाणे वागतात !’

कट असेल, तर गुन्हेगारांना फाशीची शिक्षा करा !

महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीचे प्रकरण अपघात नव्हे, तर त्यामागे कट असल्याच्या संशयावरून आतंकवादविरोधी पथक आणि इतर सुरक्षायंत्रणा यांनी अनुमाने १० सहस्र संशयितांवर बारीक लक्ष ठेवले आहे.

संपादकीय : तबलिगींचा उच्छाद ! 

तबलिगी मुसलमानांचे दिसून आलेले लक्षावधींच्या संख्येतील शक्तीप्रदर्शन म्हणजे नवी मुंबईतील हिंदूंसाठी धोक्याची घंटाच होय !

‘स्मार्टफोन’ नावाचा ब्रह्मराक्षस !

शिक्षणक्षेत्रातील ‘प्रथम’ या संस्थेने देशपातळीवर ‘असर २०२४’ हा शैक्षणिक अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालात १४ ते १६ वयोगटातील ५५ टक्के विद्यार्थ्यांचे सामाजिक माध्यमांवर वैयक्तिक खाते असल्याचे म्हटले आहे.