छत्रपती संभाजीनगर येथे अपहरण झालेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाची सुटका : जालना जिल्ह्यातून ५ आरोपी अटकेत !

छत्रपती संभाजीनगर – २ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिक सुनील तुपे यांचा ७ वर्षीय मुलगा चैतन्य याचे चारचाकीमधून आलेल्या अज्ञातांनी अपहरण केले होते. अपहरणकर्त्यांनी घटनेच्या १५ मिनिटांतच सुनील यांच्याशी संपर्क साधून खंडणीची मागणी केल्यानंतर ही घटना उघड झाली. या मुलाची सुटका करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. जालना जिल्ह्यातील भोकरदन इथून ५ फेब्रुवारीला आरोपींना कह्यात घेतले असून मुलाला कुटुंबियांकडे सोपवले आहे.

निकृष्ट दर्जाच्या सीसीटीव्हीमुळे अन्वेषणात अडचण !

कोट्यवधी रुपये खर्च करून शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे निकृष्ट दर्जाचे असल्याने पोलिसांना फुटेजमध्ये अडचणी आल्या होत्या. (ही आहे ‘स्मार्ट सिटी प्रकल्पा’ची कार्यक्षमता ? – संपादक) या कॅमेर्‍यात रात्रीची घटना नीट कैद झाली नाही, तसेच चारचाकीचा क्रमांकही दिसला नाही.