हरिद्वार – सध्या वेगवेगळ्या वस्तू सूक्ष्मदर्शकाखाली (‘मायक्रोस्कोप’खाली) ठेवून चाचण्या घेणे आणि त्याच्या निष्कर्षाविषयी व्हिडिओ बनवून तो सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित करण्याची पद्धत चालू झाली आहे. लोक खाण्या-पिण्याच्या गोष्टींपासून ते वेगवेगळे पदार्थ सूक्ष्मदर्शकाखाली ठेवून पहात आहेत. जे जिवाणू आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, ते सूक्ष्मदर्शकाच्या माध्यमातून दिसू शकतात. असाच गंगाजलाच्या शुद्धतेची पारख करणारा व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. या व्हिडिओमध्ये एका व्यक्ती हरिद्वारमधून आणलेले गंगाजल सूक्ष्मदर्शकात पाहिले, तेव्हा या पाण्यात कोणतेही जिवाणू आढळले नाहीत. यावर विश्वास बसत नसल्यामुळे त्याने मोठ्या रुग्णालयाच्या प्रयोगशाळेतील शक्तीशाली सूक्ष्मदर्शकाच्या लेन्सखाली या पाण्याची चाचणी घेतली. तेथील तज्ञांनाही पाण्यात काहीही दिसले नाही, असे या व्हिडिओत दिसत आहे.
कुठल्याही नदीचे पाणी जेव्हा सूक्ष्मदर्शकाखाली ठेवले जाते, तेव्हा त्यात अनेक प्रकारचे जीवाणू दिसतात; मात्र गंगाजलमध्ये कोणतेही जिवाणू नव्हते. यानंतर हे गंगाजल ४ दिवस तसेच ठेवण्यात आले. ४ दिवसानंतर गंगाजलची पुन्हा चाचणी करण्यात आली, तेव्हाही त्यात कोणतेही जिवाणू आढळले नाहीत.
संपादकीय भूमिकागंगाजलाच्या पावित्र्याविषयी शंका घेणार्या बुद्धीवाद्यांना चपराक ! |