इराणी टोळीकडून पोलिसांवर दगडफेक !

आंबिवली रेल्‍वेस्‍थानकातील घटना !

आंबिवली (जिल्‍हा ठाणे) – येथील रेल्‍वेस्‍थानकात इराणी टोळीने पोलिसांवर जोरदार दगडफेक केली. यात पोलीस अधिकारी यशवंत पालवे गंभीर घायाळ झाले आहेत. (आणखी किती काळ पोलिसांनी दगडफेकीत घायाळ होण्‍याचे ठरवले आहे ? – संपादक) यानंतर तेथे पोलिसांचा कडक बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला आहे. येथील चोरटा तौफिक याला कह्यात घेतल्‍यावर त्‍याच्‍या नातेवाइकांनी ही दगडफेक केली. या वेळी त्‍या टोळीनेच पोलिसांचा पाठलाग केला होता. दगडफेक केल्‍याप्रकरणी २५ जणांविरोधात गुन्‍हा नोंदवण्‍यात आला असून चौघांना अटक करण्‍यात आली आहे.

या आधीही इराणी वस्‍तीत आरोपींना अटक करण्‍यास जाणार्‍या पोलिसांवर आक्रमणे झालेली आहेत. (वारंवार अशी आक्रमणे होत असल्‍याचे ठाऊक असूनही पोलीस तेथे अधिकचा फौजफाटा का घेऊन जात नाहीत ? – संपादक)

संपादकीय भूमिका :

कायदा-सुव्‍यवस्‍थेची ऐशीतैशी !