कल्याण – मुरबाड तालुक्यातील १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर माजी उपसरंचाने लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणी तिच्या आई-वडिलांनी तक्रार प्रविष्ट केल्यावर गुन्हा नोंदवून अत्याचार करणार्याला अटक करण्यात आली आहे. अत्याचारांचे प्रमाण वाढल्याने पीडितेने घरात कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तेथे आईला तिने वरील प्रकार सांगितला.
संपादकीय भूमिकाअशा वासनांधांना कारागृहातच डांबायला हवे ! |