सांगली आणि जत विधानसभा मतदारसंघातील १२ ‘बुथ’च्‍या मत पडताळणीची मागणी !

सांगली, ५ डिसेंबर (वार्ता.) – नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभेच्‍या निवडणुकीत इ.व्‍ही.एम्. यंत्रांवर संशय व्‍यक्‍त करत काँग्रेसचे नेते आणि जत (जिल्‍हा सांगली) येथील उमेदवार विक्रमसिंह सावंत यांनी जत विधानसभा मतदारसंघातील २ बुथ आणि सांगली येथील काँग्रेसचे उमेदवार पृथ्‍वीराज पाटील यांनी सांगली विधानसभा मतदारसंघातील १० बुथच्‍या मत पडताळणीची मागणी केली आहे. या अनुषंगाने या दोघांनी जिल्‍हा निवडणूक अधिकार्‍यांकडे आवेदन प्रविष्‍ट केले आहे. जिल्‍ह्यातील एकूण १२ बुथच्‍या मत पडताळणीसाठी या दोघांनी तब्‍बल ५ लाख ६६ सहस्र ४०० रुपये निवडणूक विभागाकडे जमा केले आहेत. नियमानुसार एका बुथच्‍या मत पडताळणीसाठी ४७ सहस्र २०० रुपये शुल्‍क भरावे लागते.