सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या वेळी सोलापूर, बीड आणि सातारा येथील साधकांना आलेल्‍या अनुभूती !

‘ब्रह्मोत्‍सवाचे सर्व नियोजन देवतांनी केले आहे’, असा विचार माझ्‍या मनात आला. कार्यक्रमस्‍थळाच्‍या मैदानावरील माती सोनेरी दिसत होती आणि ‘मातीला स्‍पर्श करावा’, असे मला वाटत होते.

प्रयागराज येथील कुंभपर्वाच्‍या कालावधीत केलेल्‍या साधनेचे १ सहस्र पटींनी फळ मिळत असल्‍याने धर्मप्रसाराच्‍या सेवेत (समष्‍टी साधनेत) सहभागी व्‍हा !

प्रयागराज येथील कुंभमेळ्‍याच्‍या कालावधीत सर्वत्रच्‍या साधकांना सेवेची अमूल्‍य संधी ! १३.१.२०२५ ते ५.३.२०२५ या काळात प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथे कुंभपर्व असणार आहे. या कालावधीत संपूर्ण जगभरातील ४० कोटी भाविक प्रयागराज येथे येण्‍याची शक्‍यता आहे. या पर्वाच्‍या स्‍थळी आणि काळात केलेल्‍या साधनेचे फळ इतर स्‍थळ-काळ यांच्‍या तुलनेने १ सहस्र पटींनी अधिक मिळते. या काळात सर्व देवता, सर्व … Read more

सेवा करतांना अडचण न सुटल्‍यास साधकाने सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना प्रार्थना करणे आणि त्‍यानंतर अडचणी सुटून सेवा सहजतेने पूर्ण होणे

आश्रमात संगणकांच्‍या दुरुस्‍तीची सेवा करतांना अकस्‍मात् काही नवीन अडचण येते. त्‍या वेळी आरंभी माझ्‍या मनात विचार येतो, ‘ही सेवा करायला मला जमेल का ?’ नंतर सच्‍चिदानंद परब्रह्म डॉक्‍टरांना प्रार्थना करून सेवा चालू केल्‍यावर ती अडचण सहजतेने सुटते.