PM Modi : महिलांवरील अत्याचारांच्या प्रकरणांत न्यायालयाने गतीमानतेने निकाल देणे आवश्यक ! – पंतप्रधान

आज महिलांवरील अत्याचार आणि मुलांची सुरक्षा, हा समाजासाठी गंभीर चिंतेचा विषय आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी देशात अनेक कठोर कायदे असून न्यायालयांनी अशा प्रकरणांत गतीमानतेने निकाल दिले पाहिजेत, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

बांधकाम सल्लागार चेतन पाटील यांना पोलीस कोठडी

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळून दुर्घटना घडली होती. या प्रकरणातील संशयित आरोपी असणारे बांधकाम सल्लागार डॉ. चेतन पाटील यांना ३१ ऑगस्‍टला येथील न्‍यायालयाने ५ सप्‍टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Charkhi Dadri Lynching : दादरी (हरियाणा) येथे गोमांस खाल्ल्याच्या संशयावरून साबिर मलिक याचा मारहाणीत मृत्यू !

अटक करण्‍यात आलेल्‍या ५ जणांपैकी २ जण अल्‍पवयीन !

IMA Survey On Doctors Safety : ३५ टक्‍के महिला डॉक्‍टर रात्रपाळी करायला घाबरतात ! – इंडियन मेडिकल असोसिएशन

उच्‍चशिक्षित आणि समाजात आदराने पाहिल्‍या जाणार्‍या डॉक्‍टरांची जर ही परिस्‍थिती, तर सामान्‍य मुली आणि महिला यांच्‍यावर समाजात वावरतांना काय परिस्‍थिती ओढवत असेल, याचा विचारच न केलेला बरा !

Patanjali Dant Manjan Non Veg Ingredients : दिव्य दंतमंजनमध्ये मांसाहारी सामग्री असल्याचा दावा करणार्‍या याचिकेवरून ‘पतंजलि’ आस्थापनाला देहली उच्च न्यायालयाची नोटीस

यावर पुढील सुनावणी २८ नोव्हेंबरला होणार आहे.

Javed Akhtar On ISRO : (म्‍हणे) ‘इस्रोचे शास्‍त्रज्ञ चंद्रावर उपग्रह पाठवतात आणि मंदिरात जातात !’ – गीतकार जावेद अख्‍तर

जावेद अख्‍तर यांनी किती इस्‍लामी देशांनी विज्ञानात प्रगती केली आहे, वैज्ञानिक शोध लावले आहेत, याचीही माहिती द्यावी !

Kedarnath Helicopter Crash : केदारनाथमध्‍ये नादुरुस्‍त हेलिकॉक्‍टर एअरलिफ्‍ट करत असतांना कोसळले !

वार्‍याचा वेग आणि वजन यांमुळे हेलिकॉप्‍टरचे संतुलन बिघडू लागले. त्‍यामुळे पायलटने ते दरीत टाकून दिले.

Rajasthan High Court : २ पेक्षा अधिक मुले असणार्‍यांना सरकारी नोकरीमध्ये पदोन्नती मिळणार नाही !

तत्कालीन काँग्रेस राज्य सरकारने २ पेक्षा अधिक अपत्य असलेल्या सरकारी कर्मचार्‍यांच्या पदोन्नतीवरील बंदी उठवली होती. मुसलमानांना खुश करण्यासाठीच काँग्रेसने हा निर्णय घेतला होता, हे स्पष्ट आहे !

Jagdish Tytler 1984 Delhi Riots : काँग्रेसचे नेते जगदीश टायटलर यांच्यावर वर्ष १९८४ च्या शीखविरोधी दंगलीच्या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंदवण्यात येणार !

दोषींविरुद्ध गुन्हे नोंद व्हायला ४० वर्षे लागत असतील, तर शिक्षा व्हायला किती वेळ लागेल ? हे सर्वपक्षीय सरकारांना लज्जास्पद !

वर्षभरात मुंबईत महिलांवरील अत्‍याचार, विनयभंग आणि पॉक्‍सो अंतर्गत ४ सहस्र ३५१ गुन्‍हे नोंद !

मुंबई येथे मुंबईत १ जुलै २०२३ ते जून २०२४ या कालावधीत विनयभंगाचे सुमारे २ सहस्र २५३ गुन्‍हे नोंद झाले आहेत. बलात्‍कारांचे ९६४  गुन्‍हे नोंद झाले आहेत. माहिती अधिकारातून ही माहिती मिळाली आहे.