नागपूर – काळम्मावाडी धरणाला मागील २ वर्षे गळती चालू असून सध्या प्रतिसेकंद २७७ लिटर इतके पाणी वाया जात आहे. अत्यंत गंभीर सूत्रावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. गळती काढण्यासाठी योग्य ती कार्यवाही लवकरात लवकर करावी, अन्यथा ऐन उन्हाळ्यात याचा संपूर्ण जिल्ह्यावर ताण पडू शकतो, असा प्रश्न विधान परिषदेत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी ‘पॉईंट ऑफ इन्फर्मेशन’च्या माध्यमातून उपस्थित केला. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी याविषयी जलसंपदा विभागाला गळती काढण्यासाठी कार्यवाही करण्यासंदर्भात सूचना करण्यात येईल, असे सांगितले.