Bangladesh Mahfuz Alam Disputed Map : बांगलादेशाचे प्रमुख महंमद यूनूस यांच्या सल्लागाराने बांगलादेशाच्या नकाशात दाखवले बंगाल, आसाम आणि त्रिपुरा !

महंमद यूनूस

ढाका (बांगलादेश) – बांगलादेशातील अंतरिम सरकारचे प्रमुख महंमद युनूस यांचे सल्लागार महफूज आलम यांनी बांगलादेशाच्या १६ डिसेंबरला झालेल्या निर्मिती दिनाच्या निमित्ताने फेसबुकवर चुकीचा नकाशा पोस्ट केला होता. तसेच मजकूरही लिहिला होता. यात महफूज आलम यांनी भारतातील बंगाल, त्रिपुरा आणि आसामचा काही भाग यांना बांगलादेशात दाखवला होते. यावरून टीका झाल्यानंतर त्यांनी हा नकाशा आणि मजकूर  हटवला.

नकाशा पोस्ट करतांना महफूज आलम यांनी लिहिले होते की, आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की, दक्षिण आशियातील पाकिस्तान आणि बंगाल (बांगलादेशासमवेत) ही मुसलमानांची भूमी आहे, तर भारत ही ब्राह्मणवादी हिंदूंची भूमी आहे.

संपादकीय भूमिका

यातून बांगलादेशींची मानसिकता हळूहळू उघड होऊ लागली आहे. त्यांना आता त्यांचा निर्माता असणार्‍या भारताला गिळंकृत करायचे आहे. अशा कृतघ्न लोकांना भारताने लवकरात लवकर धडा शिकवून त्यांना मुळासकट नष्ट करणे आवश्यक आहे. अन्यथा पाकने जी भारताची स्थिती केली, तर या भागात होण्यास वेळ लागणार नाही !