(एअरलिफ्ट करणे म्हणजे लोखंडी साखळीद्वारे उचलून नेणे)
केदारनाथ (उत्तराखंड) – येथे ३१ ऑगस्ट या दिवशी सकाळी दरीत हेलिकॉप्टर कोसळले. वायूदलाच्या ‘एम्.आय्.-१७’ या हेलिकॉप्टरद्वारे ते एअरलिफ्ट केले जात होते. वार्याचा वेग आणि वजन यांमुळे हेलिकॉप्टरचे संतुलन बिघडू लागले. त्यामुळे पायलटने ते दरीत टाकून दिले.
२४ मे या दिवशी ‘केस्ट्रेल एव्हिएशन’चे हेलिकॉप्टर तुटले होते. तेव्हापासून ते हेलिपॅडवर उभे होते. त्याची गौचर विमानतळावर दुरुस्ती केली जाणार होती. त्यासाठी ते एअरलिफ्ट करून या विमानतळावर नेले जात असतांना ही घटना घडली.